सीईओ रविंदर भाकर यांच्या बदलीचे कारण ठरला रणबीरचा ‘अॅनिमल’?

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही दिवसांपासून वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सेन्सॉर बोर्ड वादात सापडले आहे. सेन्सॉर बोर्डाचे सीईओ रविंदर भाकर यांना १२ डिसेंबर रोजी पदावरून हटविण्यात आले आणि त्याच्या जागी स्मिता वत्स शर्मा यांनी पदभार स्वीकारला. दरम्यान आता सीईओ रविंदर भाकर यांना पदावरून काढण्याचे कारण बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ (Animal ) चित्रपट ठरला असल्याचे समोर … The post सीईओ रविंदर भाकर यांच्या बदलीचे कारण ठरला रणबीरचा ‘अॅनिमल’? appeared first on पुढारी.
सीईओ रविंदर भाकर यांच्या बदलीचे कारण ठरला रणबीरचा ‘अॅनिमल’?


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काही दिवसांपासून वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सेन्सॉर बोर्ड वादात सापडले आहे. सेन्सॉर बोर्डाचे सीईओ रविंदर भाकर यांना १२ डिसेंबर रोजी पदावरून हटविण्यात आले आणि त्याच्या जागी स्मिता वत्स शर्मा यांनी पदभार स्वीकारला. दरम्यान आता सीईओ रविंदर भाकर यांना पदावरून काढण्याचे कारण बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ (Animal ) चित्रपट ठरला असल्याचे समोर आले आहे.
संबंधित बातम्या 

Brijesh Tripathi : भोजपुरी अभिनेते ब्रिजेश त्रिपाठी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rubina Dilaik Twins : ३६ व्या वर्षी रुबिना दिलैकच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन; जुळ्या मुलींना दिला जन्म
Salaar Advance Booking : प्रभासच्या ‘सालार’ ची शाहरूखच्या ‘डंकी’ला टक्कर; ॲडव्हान्स बुकिंगमध्ये भरघोस कमाई

‘अ‍ॅनिमल’ला A प्रमाणपत्र देणे आणि तमिळ अभिनेता विशालने त्याच्या ‘मार्क अँटनी’ या चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्डावर लाच घेतल्याचा आरोपामुळे सीईओ रविंदर भाकर यांना काढून टाकण्यात आले आहे. विशालने ‘मार्क अँटनी’ (हिंदी) चित्रपट पास होण्यासाठी बोर्डाला ६.५ लाख रुपयांची लाच द्यावी लागल्याचा आरोप केला होता. त्यापैकी ३ लाख रुपये स्क्रीनिंगसाठी आणि ३.५ लाख रुपये प्रमाणपत्रासाठी दिले असल्याचे सांगितले होते. यानंतर या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आला होता.
दरम्यान बॉलिवूड अभिनेता ‘अ‍ॅनिमल’ (Animal ) चित्रपटाला A प्रमाणपत्र दिले गेलं. यानंतर महिलांवरील अत्याचार आणि अत्याचाराचे सीन दाखवणाऱ्या चित्रपटाला A ग्रेडचे प्रमाणपत्र कसे देता येईल? अशा प्रश्न झुम टिव्हीवरील एका स्त्रोताने उपस्थित केला गेला. अॅनिमल चित्रपटातील हिंसाचार आणि विशेषतः महिलांवरील आक्षेपार्ह दृश्ये न हटवल्याने आता देशात आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयात वाद निर्माण होत असल्याचेही त्यांने सांगितले. दरम्यान या घटेनचा तपास सुरू असून सीईओ रविंदर भाकर यांची मात्र बदली करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत्त माहिती समोर आलेली नाही.

 

View this post on Instagram

 
A post shared by Zoom TV (@zoomtv)

The post सीईओ रविंदर भाकर यांच्या बदलीचे कारण ठरला रणबीरचा ‘अॅनिमल’? appeared first on Bharat Live News Media.

Go to Source