मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही : राज ठाकरे

मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही : राज ठाकरे

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला मुळाच आरक्षण मिळणारच नाही, हे मी मनोज जरांगे पाटील यांना भेटून सांगितले होते. तरी ही जरांगे आंदोलन करीत आहेत, त्यांच्या पाठीमागे कोण आहे,त्याचा बोलवता धनी कोण ? हे कालांतराने कळेल असे सांगून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे जातीपातीचे राजकारण करणारे अदृश्य शक्ती असल्याचा आरोप आज ठाण्यात केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज ठाण्यात पक्ष वाढीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचा पुनरुच्चार केला आहे. तसेच २४ डिसेंबरनंतर मुंबईत धडकणारे मनोज जरांगे पाटील हे काय संटॅक्लोज आहेत का ? असा प्रश्न करीत मुंबईत धडकण्याच्या मराठा आंदोलनकर्त्यानी सरकारला दिलेल्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

भाजपच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडत विकास कामे सांगण्याऐवजी रामाचे दर्शन घडविण्याचे आमिषे कसली दाखवता. भाजपने टूर अँड ट्रव्हल हे नवीन खाते उघडले असल्याची टीकाही ठाकरे यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या मोफत रामलल्ला दर्शन घडविणर या वक्तव्यावर केले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी केले. स्वतच्या स्वार्थापोटी जातीपातीचे द्वेष पसरून राज्याची वाट लावली जात आहे, महाराष्ट्राला खड्ड्यात घातले जात असल्याची टीका ठाकरे यांनी केले. पदवीधर मतदार संघासाठी पदवीधर उमेदवार हवा अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.
हेही वाचा 

Uddhav Thackeray : भाजपला फ्री हिट, आमची मात्र हिट विकेट: उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
Uttarakhand Tunnel : बोगद्यात अडकलेल्या ४० कामगारांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य; अमेरिकेतून ड्रिल मशीन मागविले
केजरीवाल आलेच नाहीत तर मुख्यमंत्री मान न भेटताच निघून गेले; नागपुरातील कार्यकर्त्यांचा हिरमोड

The post मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही : राज ठाकरे appeared first on पुढारी.

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला मुळाच आरक्षण मिळणारच नाही, हे मी मनोज जरांगे पाटील यांना भेटून सांगितले होते. तरी ही जरांगे आंदोलन करीत आहेत, त्यांच्या पाठीमागे कोण आहे,त्याचा बोलवता धनी कोण ? हे कालांतराने कळेल असे सांगून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे जातीपातीचे राजकारण करणारे अदृश्य …

The post मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही : राज ठाकरे appeared first on पुढारी.

Go to Source