रुबिना दिलैकच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन; जुळ्या मुलींना दिला जन्म
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक काही दिवसांपासून तिच्या प्रेंग्नन्सीमुळे चर्चेत आली होती. आता लग्नाच्या पाच वर्षानंतर आणि ३६ व्या वर्षी तिच्या घरी नव्या पाहूण्याचे आगमन झाले आहे. रूबिनाने सध्या जुळ्या मुलींना जन्म ( Rubina Dilaik Twins ) दिला आहे. ही गुडन्यूज रूबिनाची ट्रेलरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत दिली आहे. मात्र, काहीच तासांत तिने ही पोस्ट डिलीट केली आहे. दुसरीकडे रूबिना किंवा पती अभिनव शुक्ला याच्यांकडून याबाबतची कोणताही माहिती मिळालेली नाही. दरम्यान या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलेब्रिटींनी भऱभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.
संबंधित बातम्या
अभिनेत्री सई लोकूरला कन्यारत्न; जन्मगाव बेळगावात केले पहिल्या बाळाचे स्वागत
Salaar Advance Booking : प्रभासच्या ‘सालार’ ची शाहरूखच्या ‘डंकी’ला टक्कर; ॲडव्हान्स बुकिंगमध्ये भरघोस कमाई
Salaar First Song : प्रभासच्या ‘सालार’मधील ‘सूरज ही छाव बनाके’ पहिलं गाणं रिलीज
अभिनेत्री रुबिना दिलैक आणि तिचा पती अभिनव शुक्ला गेल्या काही दिवसांपासून आई- वडिल होणार असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान दोघांनी सोशल मीडियावर व्हिडिओ आणि बेबीबंपचे फोटोशूट करून याबाबतची माहिती दिली होती. दरम्यान एका व्हिडिओतून रूबिना जुळ्या मुंलाना जन्म देणार असल्याची माहिती मिळाली त्यांनी दिली होती. आता रुबिनाची डिलीव्हरी झाली असून तिने जुळ्या मुलींना जन्म दिलाय. ही गुडन्यूज रूबिनाची एका ट्रेलरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.
ट्रेलरने रूबिनासोबतचा जिममधील एक फोटो शेअर करून ही गुडन्यूज दिली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘दोन जुळ्या मुलींसाठी रुबीना तुझं अभिनंदन’ असे लिहिलं आहे. मात्र, काही तासांतच तिने ही पोस्ट डिलीट केली आहे. ही पोस्ट का डिलीट केली? याची अद्याप अधिकृत्त माहिती मिळालेली नाही.तर दुसरीकडे रूबिनाच्या घरांच्यानी किंवा पती अभिनव शुक्लाने याबाबतची कोणताही माहिती दिलेली नाही. दरम्यान रूबिना आई झाल्याने सोशल मीडियावर तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ( Rubina Dilaik Twins )
View this post on Instagram
A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)
View this post on Instagram
A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)
The post रुबिना दिलैकच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन; जुळ्या मुलींना दिला जन्म appeared first on Bharat Live News Media.