बारामतीत जुनी मंडई पाडण्याचे काम सुरू

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती नगरपरिषदेच्या वतीने शहरातील जुनी मंडई पाडण्याचे काम सुरू झाले आहे. या ठिकाणी नगरपरिषद स्मार्ट ग्राहक मॉल उभारणार असून, विकासकामे हाती घेतली आहेत. बारामती शहराचा विकास झपाट्याने होत असतानाच शहर व तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय, सहकारी संस्था, महाविद्यालये, माध्यमिक विद्यालये, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालये हायटेक करण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार … The post बारामतीत जुनी मंडई पाडण्याचे काम सुरू appeared first on पुढारी.

बारामतीत जुनी मंडई पाडण्याचे काम सुरू

बारामती : Bharat Live News Media वृत्तसेवा : बारामती नगरपरिषदेच्या वतीने शहरातील जुनी मंडई पाडण्याचे काम सुरू झाले आहे. या ठिकाणी नगरपरिषद स्मार्ट ग्राहक मॉल उभारणार असून, विकासकामे हाती घेतली आहेत. बारामती शहराचा विकास झपाट्याने होत असतानाच शहर व तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय, सहकारी संस्था, महाविद्यालये, माध्यमिक विद्यालये, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालये हायटेक करण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यश आले. त्याच धर्तीवर बारामती शहरातील जुनी भाजी मंडई आता नव्याने बांधण्यात येणार आहे. कॉर्पोरेटला महत्त्व देऊन आणि काळानुरूप बदल करून शहरात विकासकामे करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील ‘स्मार्ट’ ग्राहक’ मॉल संस्कृतीकडे आकृष्ट झाला आहे.
बारामती नगरपरिषदेने ‘स्मार्ट कॉर्पोरेट लूक’ देऊन येथील विकासकामे हाती घेतली आहेत. जुन्या मंडईच्या जागेवर अत्याधुनिक सर्व सोयींनीयुक्त कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. येथील जुन्या भाडेकरूंना नवीन संकुलात प्राधान्याने गाळे देण्यात येणार आहेत. नगरपरिषदेच्या वतीने बारामती शहरात गणेश भाजी मंडई उभारण्यात आली. जुनी मंडई येथे अत्याधुनिक कॉर्पोरेट लूक देऊन शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. वाहनतळ आणि मॉल येथे तयार करण्यात येत आहे. नगरपरिषदेच्या वतीने येथील व्यावसायिकांना नोटीस देत दुकानातील सर्व साहित्य हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्व:मालकीचे रिकामे भूखंड व काही व्यवसायिक इमारतींचे नूतनीकरण हाती घेतले आहे.
विकासकामे होताना अधिक दर्जेदार व अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त अशा व्यवसायिक निवडीला प्राधान्य देण्यात येत आहे. बारामती नगरपरिषद हद्दीत कॉम्प्लेक्स बांधकामासाठी नगर विकास विभागाकडून 85 टक्के निधी, तर 15 टक्के नगरपरिषद हिस्सा असे एकूण 46 कोटी 79 लाख 91 हजारांपेक्षा अधिक निधी यासाठी मंजूर करण्यात आला आहे. वाहनतळासह दुमजली 15 हजार 911.66 चौ. मी. बांधकाम करण्यात येणार आहे. शहराच्या वैभवात भर घालणारा व व्यवसाय वाढविणारा हा दूरदृष्टीचा विकास उभा राहणार आहे. त्यासाठी येथील जुन्या मंडईतील काही व्यावसायिकांनी स्वतःहून आपले गाळे नगरपरिषदेकडे परत केले. ते जमीनदोस्त करण्यात आले. येथील व्यावसायिकांचे तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यात येणार आहे.
 
 
The post बारामतीत जुनी मंडई पाडण्याचे काम सुरू appeared first on Bharat Live News Media.

Go to Source