बेळगाव : अभिनेत्री सई लोकूरला कन्यारत्‍न

बेळगाव : बेळगावची अभिनेत्री आणि ‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकूर हिला कन्यारत्न झाले. तिने आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत बेळगावतच केले आहे. याबाबतची माहिती तिने नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली आहे. सई व तिचा पती तीर्थदीप रॉय या दोघांनी पहिल्या बाळाचे स्वागत बेळगावात करण्याच ठरवून काही महिन्यापूर्वी समाजमाध्यमावर तशी माहिती दिली होती. बिग बॉस … The post बेळगाव : अभिनेत्री सई लोकूरला कन्यारत्‍न appeared first on पुढारी.

बेळगाव : अभिनेत्री सई लोकूरला कन्यारत्‍न

संदीप तारिहाळकर

बेळगाव : बेळगावची अभिनेत्री आणि ‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकूर हिला कन्यारत्न झाले. तिने आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत बेळगावतच केले आहे. याबाबतची माहिती तिने नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली आहे. सई व तिचा पती तीर्थदीप रॉय या दोघांनी पहिल्या बाळाचे स्वागत बेळगावात करण्याच ठरवून काही महिन्यापूर्वी समाजमाध्यमावर तशी माहिती दिली होती.
बिग बॉस मराठी या रिॲलिटी शो मधून घराघरात पोहोचलेली बेळगावची अभिनेत्री म्हणून सई लोकूरला ओळखले जाते. गत काही दिवसांपासून सई ही तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. (३५ वर्षीय) सई लोकूर ही आई झाली असून, तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. याबाबत तिच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता लागून होती. ती पुन्हा रुपेरी पडद्यावर कधी झळकणार, याबाबत तिने आधीच संवाद साधून माझ्या बाळंतपणानंतर योग्य वेळ आल्यानंतर मी पुन्हा पडद्यावर काम करायला सुरुवात करेन, असे तिने जाहीर केले आहे.
ती म्हणते, मी माझ्या जन्मगावी म्हणजेच बेळगाव इथे माझ्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. मी आनंदी आहे. बेळगाव येथील उद्योजक बेलचीक कंपनीचे एमडी अजित लोकूर तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेच्या अध्यक्षा व चित्रपट निर्मात्या विणा लोकूर यांची ती कन्या होय.
हेही वाचा : 

‘मेरी मर्जी…’ महापालिका निवडणुकांबाबत राज ठाकरे असे का म्‍हणाले?  
NIA Raids In India : दहशतवादी नेटवर्क प्रकरणी NIAची मोठी कारवाई, महाराष्ट्रासह ४ राज्यांत छापेमारी

Raosaheb Danve | इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी ममता बॅनर्जी पीएम मोदींना भेटणार; केंद्रीय मंत्री दानवेंची माहिती

The post बेळगाव : अभिनेत्री सई लोकूरला कन्यारत्‍न appeared first on Bharat Live News Media.

Go to Source