Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकच्या पार्श्वभूमीवर आज (दि.१८) पदाधिकार्यांची बैठक घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंना अभिनेता ९०च्या दशकातील अभिनेता गोविंदाच्या ‘मेरी मर्जी..” या गाण्याचं स्मरण झाले. जाणून घेवूया राज ठाकरे नेमके काय म्हणाले याबाबत…
पदाधिकार्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, देशातील सर्वच महत्त्वाचे प्रकल्प विकसितकरण्यासाठी अदानी समुहाला प्राधान्या दिले जात आहे. केवळ अदानी यांचीच कंपनी कशी दिसते? महाविकास आघाडीचे नेत्यांनाही आता अदानी प्रकल्पाविरुद्ध रस्त्यावर उतरत आहे; मग या प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हा तुम्ही कुठे होता, असे खोचक सवालही त्यांनी केले.
महापालिका निवडणुका केव्हा होणार…. मेरी मर्जी…
राज्यात महानगरपालिका निवडणूक केव्हा होतील, असा सवाल यावेळी राज ठाकरेंना करण्यात आला. यावर ते म्हणाले की, सध्या कायदा व्यवस्थाच अस्तित्वात नाही. महापालिका निवडणुका ही २०२५ मध्ये होईल. कारण देशात निवडणूक आयोग कोणतेच निर्णय घेत नाही. सगळा कारभार गोविंदाचे गाणं नव्हतं का, ‘मेरी मर्जी…’ असा सुरु आहे. त्यामुळे २०२५ मध्येच राज्यातील महानगरपालिका निवडणूक घेण्यात येतील, असा सांगत त्यांनी अप्रत्यक्ष केंद्रासह राज्य सरकारला टोला लगावला.
हेही वाचा :
NIA Raids In India: दहशतवादी नेटवर्क प्रकरणी NIAची मोठी कारवाई, महाराष्ट्रासह ३ राज्यात छापेमारी
Salaar Advance Booking : प्रभासच्या ‘सालार’ ची शाहरूखच्या ‘डंकी’ला टक्कर; अॅडव्हान्स बुकिंगमध्ये भरघोष कमाई
Raosaheb Danve | इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी ममता बॅनर्जी पीएम मोदींना भेटणार; केंद्रीय मंत्री दानवेंची माहिती
The post ‘मेरी मर्जी…’ महानगरपालिका निवडणुकांबाबत राज ठाकरे असे का म्हणाले? appeared first on Bharat Live News Media.