हृदयविकारापासून दूर ठेवतात ‘हे’ पदार्थ
नवी दिल्ली : सध्याच्या काळात हृदयविकाराचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलच्या समस्या वाढल्या आहेत. अनेकांचा हार्टअॅटॅक किंवा कार्डियाक अरेस्टने मृत्यू होत आहे. अशा स्थितीत हृदयाचे आरोग्य जपणे हे गरजेचे बनले आहे. त्यासाठी विशिष्ट आहार उपयुक्त ठरू शकतो, असे आहारतज्ज्ञांनी म्हटले आहे. त्याची ही माहिती…
डार्क चॉकलेट : डार्क चॉकलेट तुम्हाला हृदयरोगापासूनही वाचवू शकते. डार्क चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडंटस् आणि फ्लेव्होनॉईडस् आढळतात, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. जे लोक आठवड्यातून 5 दिवस डार्क चॉकलेट खातात त्यांना हृदयविकाराचा धोका 57 टक्क्यांनी कमी होतो.
एवोकाडो : एवोकाडो हे अतिशय चवदार फळ आहे. यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते जे हृदयासाठी फायदेशीर असते, जर तुम्ही याचे रोज सेवन केले ,तर तुम्ही हृदयविकारांपासून दूर राहू शकता.
अखंड धान्य : संपूर्ण किंवा अखंड धान्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्त्वे असतात. त्यांच्यामध्ये एंडोस्पर्म आणि कोंडा असतो. हे सर्व घटक काही सामान्य प्रकारच्या संपूर्ण धान्यांमध्ये आढळतात. जसे तपकिरी तांदूळ, बार्ली, ओटस् इ. त्यांच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते.
The post हृदयविकारापासून दूर ठेवतात ‘हे’ पदार्थ appeared first on Bharat Live News Media.
Home ठळक बातम्या हृदयविकारापासून दूर ठेवतात ‘हे’ पदार्थ
हृदयविकारापासून दूर ठेवतात ‘हे’ पदार्थ
नवी दिल्ली : सध्याच्या काळात हृदयविकाराचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलच्या समस्या वाढल्या आहेत. अनेकांचा हार्टअॅटॅक किंवा कार्डियाक अरेस्टने मृत्यू होत आहे. अशा स्थितीत हृदयाचे आरोग्य जपणे हे गरजेचे बनले आहे. त्यासाठी विशिष्ट आहार उपयुक्त ठरू शकतो, असे आहारतज्ज्ञांनी म्हटले आहे. त्याची ही माहिती… डार्क चॉकलेट : डार्क चॉकलेट तुम्हाला हृदयरोगापासूनही वाचवू …
The post हृदयविकारापासून दूर ठेवतात ‘हे’ पदार्थ appeared first on पुढारी.