घुसखोरी प्रकरणावरून लोकसभेत गदारोळ सुरूच; कामकाज तहकूब

पुढारी ऑनलाईन डेस्क : संसदेच्या लोकसभेचे सत्र सुरू होताच आज (दि.१८) पुन्हा संसदेत घुसखोरी प्रकरणावरून विरोधकांनी गोंधळ घातला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेत या प्रकरणावरून निवेदन करत असताना विरोधक आक्रमक झाले, त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. ( Winter Session 2023) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 11 वा दिवस आहे. दरम्यान, लोकसभा … The post घुसखोरी प्रकरणावरून लोकसभेत गदारोळ सुरूच; कामकाज तहकूब appeared first on पुढारी.

घुसखोरी प्रकरणावरून लोकसभेत गदारोळ सुरूच; कामकाज तहकूब

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : संसदेच्या लोकसभेचे सत्र सुरू होताच आज (दि.१८) पुन्हा संसदेत घुसखोरी प्रकरणावरून विरोधकांनी गोंधळ घातला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेत या प्रकरणावरून निवेदन करत असताना विरोधक आक्रमक झाले, त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. ( Winter Session 2023)
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 11 वा दिवस आहे. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेत घुसखोरी प्रकरणावर निवेदन केले. यावेळी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, विरोधकांनी सभागृहात गोंधळ सुरूच ठेवला. त्यामुळे अध्यक्ष बिर्ला यांनी सोकसभेच्या कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केले.  (Winter Session 2023)

#WinterSession2023 #LokSabha adjourned to meet again at 12:00 Noon pic.twitter.com/DIENGiodPj
— SansadTV (@sansad_tv) December 18, 2023

राज्यसभेचे कामकाज देखील दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब
संसदेच्या राज्यसभा सभागृहात देखील सत्र सुरू होताच, घुसखोरी प्रकरणावरून  विरोधक आक्रमक झाले. दरम्यान राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी दुपारी २ वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले. तसेच सभागृहाचे खासदार जेबी माथेर आणि बिनॉय विश्वम यांना सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्या प्रकरणी इशारा देखील दिला.

Rajya Sabha adjourned till 2pm amid ruckus in the House https://t.co/18FkS4Cx7T
— ANI (@ANI) December 18, 2023

हेही वाचा:

लोकसभेतील घुसखोरी चिंताजनक : पंतप्रधान मोदी
संसद ‘घुसखोरी’चा व्हिडिओ ललित झाने केला शेअर, मित्रांना व्‍हायरल करायला सांगितला
Parliament Security Breach : लोकसभा घुसखोरीतील आरोपींचे जळालेले मोबाईल, कपडे राजस्थानमध्ये सापडले

The post घुसखोरी प्रकरणावरून लोकसभेत गदारोळ सुरूच; कामकाज तहकूब appeared first on Bharat Live News Media.

Go to Source