Rise Up season 2 : क्रीडा विकास प्रकल्प, राजमाता, एसबी संघाला विजेतेपद

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ‘दै. पुढारी’ आयोजित राईझ अप महिलांच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत किशोरी गटात इंदापूरच्या एसबी पळसदेव संघाने, महिला गटात राजमाता जिजाऊ संघाने, तर कुमारी गटात क्रीडा विकास प्रकल्प संघाने विजेतेपद पटकाविले. दै. ‘पुढारी’ च्या वतीने आणि पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या सहकार्याने ही स्पर्धा नेहरू स्टेडियमच्या मैदानावर पार पडली. स्पर्धेचे पारितोषिक … The post Rise Up season 2 : क्रीडा विकास प्रकल्प, राजमाता, एसबी संघाला विजेतेपद appeared first on पुढारी.

Rise Up season 2 : क्रीडा विकास प्रकल्प, राजमाता, एसबी संघाला विजेतेपद

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा :  ‘दै. Bharat Live News Media’ आयोजित राईझ अप महिलांच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत किशोरी गटात इंदापूरच्या एसबी पळसदेव संघाने, महिला गटात राजमाता जिजाऊ संघाने, तर कुमारी गटात क्रीडा विकास प्रकल्प संघाने विजेतेपद पटकाविले. दै. ‘Bharat Live News Media’ च्या वतीने आणि पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या सहकार्याने ही स्पर्धा नेहरू स्टेडियमच्या मैदानावर पार पडली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘अर्जुन’ पुरस्कार प्राप्त श्री शांताराम जाधव यांच्या हस्ते पार पडले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन सचिव संदीप पायगुडे, कार्याध्यक्ष दत्ता कळमकर, पंच प्रमुख, निवेदक संतोष जगदाळे, सहायक पंचप्रमुख इम्रान शेख, स्पर्धा निरीक्षक संदीप पायगुडे, मैदान व्यवस्था बनवणारे सागर वाळके, पुणे जिल्हा कबड्डी संघटना, शिवदत्त आणि सिंहगड क्रीडा मंडळाचे सर्व सहकारी यांचे सहकार्य मिळाले.

किशोरी गटाच्या अंतिम लढतीमध्ये बलाढ्य राजमाता जिजाऊ संघाचा इंदापूरच्या एसबी पळसदेव संघाने 35-30 असा केवळ 5 गुणांच्या फरकाने पराभव करीत विजेतेपद पटकाविले. या सामन्यामध्ये राजमाता संघाकडून सानिका वळसे आणि तनिष्का तिकोणे यांनी उत्कृष्ट खेळ केला तर पळसदेव संघाकडून वर्षा बनसुडे, सपना बांडे आणि अमृता शेलार यांनी चांगला खेळ केला. या गटामध्ये तृतीय क्रमांक क्रीडा विकास प्रकल्प पिंपरी चिंचवड, चौथा क्रमांक डॉ. पतंगराव कदम संघाने विजय मिळविला. उत्कृष्ट चढाई म्हणून राजमाता जिजाऊच्या सानिका वाकसे हिला, उत्कृष्ट पकड एसबी पळसदेवच्या रचना भांडे, अष्टपैलू खेळाडू म्हणून एसबी पळसदेवची वर्षा बनसोडे, तर उदयोन्मुख खेळाडू म्हणून क्रीडा विकास प्रकल्पाच्या सरस्वती शिवमोरे यांना गौरविण्यात आले.

कुमारी गटामध्ये क्रीडा विकास प्रकल्प संघाने राजमाता जिजाऊ संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. या गटामध्ये तृतीय क्रमांक विजयमाला कदम कबड्डी संघ, तर चौथा क्रमांक तिरंगा स्पोर्ट्स क्लब संघाने पटकाविला. उत्कृष्ट चढाई राजमाता जिजाऊच्या साक्षी रावडे, उत्कृष्ट पकड क्रीडा विकास प्रकल्पच्या भूमिका गोरे, अष्टपैलू खेळाडू क्रीडा विकास प्रकल्पची रेखा राठोड, तर उदयोन्मुख खेळाडू म्हणून आकांक्षा रेणुसे हिला गौरविण्यात आले.

 
महिला गटाच्या अंतिम लढतीमध्ये राजमाता जिजाऊ संघाने प्रकाशतात्या बालवडकर संघाचा 48-25 असा 23 गुणांच्या फरकाने पराभव करीत विजेतेपद पटकाविले. राजमाता संघाकडून कोमल आवळे, प्रियांका मांगलेकर आणि झुबेरिया पिंजारी यांनी उत्कृष्ट खेळ केला. बालवडकर संघाकडून गितांजली नेमसे, आकांक्षा जाधव आणि कोमल राठोड यांनी चांगला खेळ केला. या गटामध्ये विजयमाला कदम कबड्डी संघाने तृतीय क्रमांक तर डॉ. पतंगराव कदम स्पोर्ट्स क्लबने चौथा क्रमांक पटकाविला. उत्कृष्ट चढाई म्हणून प्रकाश तात्या बालवडकर संघाच्या हर्षा शेट्टी, उत्कृष्ट पकड म्हणून राजमाता जिजाऊच्या प्रिया मांगलेकर, अष्टपैलू खेळाडू म्हणून राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स क्लबच्या रेखा सावंत, तर उदयोन्मुख खेळाडू म्हणून डॉ. पतंगराव कदम स्पोर्ट्स क्लबच्या सानिका खाडेला गौरविण्यात आले.

 
या स्पर्धेच्या उपांत्य लढतीच्या किशोरी गटात एसबी पळसदेव संघाने कला क्रीडा विकास प्रकल्प संघाचा 33-10 असा 23 गुणांनी पराभव केला. विजयी संघाकडून वर्षा बनसुडे, रचना बाडे आणि अमृता शेलार यांनी, तर पराभूत संघाकडून सरस्वती शिवमोरे आणि नंदिनी साधू यांनी उत्कृष्ट खेळ केला. दुसर्‍या सामन्यात राजमाता जिजाऊ संघाने डॉ. पतंगराव कदम महिला कबड्डी संघाचा 50- 24 असा 26 गुणांच्या फरकाने पराभव केला. विजयी संघाकडून सानिका वाकसे आणि तनिष्का तिकोणे यांनी, तर कदम संघाकडून श्रृती भामे आणि आर्या लवाडे यांनी चांगला खेळ केला.

कुमारी गटामध्ये राजमाता जिजाऊ संघाने तिरंगा स्पोर्ट्स क्लब संघाचा 54-19 असा 35 गुणांनी पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. विजयी संघाकडून सुवेरिया पिंजारी, संस्कृती खिलारे आणि साक्षी रावडे यांनी, तर पराभूत संघाकडून प्राची कांबळे आणि साक्षी रेणुसे यांनी उत्कृष्ट खेळ केला. दुसर्‍या सामन्यात कला क्रीडा विकास प्रकल्प संघाने विजयमाला कदम कबड्डी संघाचा 42-07 असा 35 गुणांनी पराभव केला. कदम संघाकडून अपूर्वा ढमाले तर विजयी संघाकडून मनीषा राठोड, भूमिका गोरे, पूजा तेलंग यांनी उत्कृष्ट खेळ केला.
महिलांच्या उपांत्य लढतीत राजमाता जिजाऊ संघाने विजयमाला कदम कबड्डी संघाचा 42-16 असा 26 गुणांच्या फरकाने पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. राजमाता संघाकडून सलोनी गजमल, मंदिरा कोमकर आणि साक्षी रावडे यांनी, तर कदम संघाकडून अपूर्वा ढमाले आणि ऐश्वर्या काळे यांनी उत्कृष्ट खेळ केला. दुसर्‍या सामन्यामध्ये प्रकाशतात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंंडेशन संघाने डॉ. पतंगराव कदम कबड्डी संघाचा 41-25 असा 16 गुणांनी पराभव केला. बालवडकर संघाकडून अंकिता चव्हाण हर्षा शेट्टी आणि अंकिता पिसाळ यांनी, तर पराभूत संघाकडून सानिका खाडे आणि कल्याणी ठोंबरे यांनी उत्कृष्ट खेळ केला.
या राईझ अप सिझन 2 साठी माणिकचंद ऑक्सिरिच हे मुख्य प्रायोजक असून, सहप्रायोजक म्हणून रूपमंत्रा, मीडिया प्रायोजक म्हणून झी टॉकीज, एज्युकेशन पार्टनर म्हणून सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट, बँकिंग पार्टनर म्हणून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी आणि सपोर्टिंग पार्टनर म्हणून पुणे महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.
The post Rise Up season 2 : क्रीडा विकास प्रकल्प, राजमाता, एसबी संघाला विजेतेपद appeared first on Bharat Live News Media.

Go to Source