भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा.लि.
अगोदरच बूल रनमध्ये असलेल्या मार्केटला अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याज दर न वाढवण्याच्या घोषणेने बूस्टर मिळाला आणि निफ्टीने 21,500 चा दरवाजा खटखटायला सुरुवात केली. शुक्रवारी 21492.30 चा विक्रम नोंदवून तो 21456.65 वर बंद झाला. सेन्सेक्सने बघता बघता 70,000 चा टप्पा ओलांडून 71605.76 ला स्पर्श केला आणि दिवसअखेरीस 71483.75 वर बंद झाला. निफ्टी बँक आता 50 हजार पार करण्यासाठी सज्ज झाला आहे. 48143.55 हा त्याचा शुक्रवारचा बंद भाव आहे. (Stock Market)
निफ्टी फार्मा वगळता सर्व सेक्टरला निर्देशांक मागील आठवड्यात तेजीत होते. परंतु, निफ्टी आयटी निर्देशांकाने तेजीला खरे बळ दिले. साडेआठ टक्क्यांहून अधिक हा निर्देशांक वाढला. विप्रो, इन्फोसिस, टीसीएस, टेक, महिंद्र, एलटीटीएस हे शेअर्स सहा ते सात टक्क्यांनी वाढले. पर्सिस्टंट सिस्टीम्सचा शेअर सर्वाधिक (14.52 %) वाढला. सोबत एंफॅसिस, एचसीएल टेक, एलटीआय माइंडट्री, कोफोर्ज हे शेअर्स 11 ते 13 टक्क्यांनी वाढले.
SBI म्युच्युअल फंडने करूर वैश्य बँकेचे 1 कोटी 20 लाख शेअर्स विकत घेतले. रु. 162 प्रति शेअरप्रमाणे हा 194.4 कोटी रुपयांचा व्यवहार होता आणि करूर बँकेचा हा 1.5 टक्के स्टेक होता. रु. 170.05 ला आज मिळणारा हा शेअर अगदी अल्पावधीत 200 रुपयांपर्यंत जाईल असे वाटते.
GMR Infra चा शेअर आठवड्यात 25 टक्क्यांपेक्षा अधिक वाढला. हा शेअर याच महिन्यात 100 रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. जानेवारी 2023 मध्ये त्याचा भाव 36 रुपये होता. केवळ एका वर्षाच्या आत तो 100 टक्क्यांपेक्षा अधिक वाढला आहे. मुख्यतः एअरपोर्टस्मध्ये काम करणार्या या कंपनीच्या शेअर्समध्ये GQG Partners, Goldmansachs, Nomura India या Investment firms नी प्रचंड गुंतवणूक केली आहे.
IRCTC ही रेल्वेला कॅटरिंग सुविधा पुरविणारी कंपनी आता रेल्वेबाहेर आपल्या सुविधांचा विस्तार करणार आहे. गेले वर्षभर हा शेअर फारसा वाढलेला नाही. परंतु, आता या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास वर्षभरात चांगला परतावा मिळेल.
MRF या लाखमोलाच्या शेअरची वाटचाल आता सव्वा लाखाकडे सुरू आहे. शुक्रवारचा त्याचा बंद भाव 1,21,193 रुपये होता. Shree Cernent हा आणखी एक Heavy Weight आता तीस हजारी होईल. (आजचा भाव रु. 28997.65) Ultratech Cement ने 10,000 चा टप्पा ओलांडला.
Bhel ची दमदार वाटचाल सुरूचा आहे. गेल्या सहा महिन्यांत हा शेअर दुप्पट झाला आहे. Ministry of Heavy Industries च्या अंतर्गत काम करणारी CMTI ही एक स्वायत्त संस्था आहे. (Central Manufacturing Technology Institute) हायड्रोजन व्हॅल्यू चेन आणि इंडस्ट्रीयल इंटरनेट ऑफ थिंग्ज या क्षेत्रात काम करण्यासाठी भेलने CMIT बरोबर नुकताच एक करार केला.
पुढील आठवड्यात 21,500 वरून मार्केटमध्ये थोडे Correction येईल, असा बहुतेक बाजारतज्ज्ञांचा अंदाज आहे; परंतु असे करेक्शन आले, तरी ते तात्पुरते असणार आहे. सध्याच्या तेजीवर त्याचा काही परिणाम होणार नाही. परकीय गुंतवणूक संस्थांची अखंड खरेदी सुरू आहे. फेडरल रिझर्व्हने व्याज दर न वाढवल्यामुळे भारतीय बाजार हा सर्वांसाठी एकमेव Investment Hub सध्या तरी आहे. कारण, अमेरिकेतील Bond Yields चार टक्क्यांच्याही खाली आले आहेत. (Stock Market)
देशी गुंतवणूक संस्थांची खरेदी -विक्री सुरूच आहे. म्युच्युअल फंडाकडे सामान्य गुंतवणूकदारांचा ओढा प्रचंड वाढला आहे. भारतातील म्युच्युअल फंड व्यवसाय 50 लाख कोटींचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. दरमहाचा SIP बुक साईझ हा आता 17,000 कोटींचा झाला आहे. हा सर्व पैसा बाजारातच येणार आहे.
ही तेजी कुठवर जाणार आहे? की ती अल्पकालीन असणार आहे? 26 ऑक्टोबर 2023 रोजी 18857 वर असणारा निफ्टी आज 21500 वर आहे. म्हणजे दीड महिन्यात निफ्टी सुमारे 14 टक्के वाढला. अजून किती तो वाढेल, यासाठी भारतीय बाजारातील तेजीचा इतिहास पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
The post तेजी कुठवर जाणार? ‘हे’ शेअर्स मिळवून देतील चांगला परतावा appeared first on Bharat Live News Media.