रेकॉर्डब्रेक तेजीला ब्रेक! सेन्सेक्स, निफ्टी घसरले

पुढारी ऑनलाईन : रेकॉर्डब्रेक तेजीनंतर आज सोमवारी (दि. १८) आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली. आशियाई बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर ही घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स आज ३०० अंकांच्या घसरणीसह खुला झाला होता. त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास सेन्सेक्स १२४ अंकांनी घसरून ७१,३५० वर व्यवहार करत होता. तर निफ्टी २१,४३२ वर होता. (Stock Market Updates) सेन्सेक्सवर … The post रेकॉर्डब्रेक तेजीला ब्रेक! सेन्सेक्स, निफ्टी घसरले appeared first on पुढारी.

रेकॉर्डब्रेक तेजीला ब्रेक! सेन्सेक्स, निफ्टी घसरले

Bharat Live News Media ऑनलाईन : रेकॉर्डब्रेक तेजीनंतर आज सोमवारी (दि. १८) आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात घसरण झाली. आशियाई बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर ही घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स आज ३०० अंकांच्या घसरणीसह खुला झाला होता. त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास सेन्सेक्स १२४ अंकांनी घसरून ७१,३५० वर व्यवहार करत होता. तर निफ्टी २१,४३२ वर होता. (Stock Market Updates)
सेन्सेक्सवर आयटीसी, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम, इंडसइंड बँक, पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक, जेएसडब्ल्यू स्टील, इन्फोसिस, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स घसरले आहेत. तर सन फार्मा, नेस्ले इंडिया, विप्रो, भारती एअरटेल हे शेअर्स वाढले आहेत.
आशियाई बाजारात कमकुवत स्थिती
आज सोमवारी आशियाई बाजारात संथ सुरुवातीनंतर घसरण दिसून येत आहे. बँक ऑफ जपान (BOJ) ची आजपासून दोन दिवसीय पतविषयक धोरण बैठक सुरू झाली. यामुळे गुंतवणूकदारांचे जपानच्या मध्यवर्ती बँकेच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या या सावध भूमिकेचे आशियाई बाजारात पडसाद दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात जपानचा निक्केई २२५ निर्देशांक ०.६६ टक्के म्हणजेच २१७.४६ अंकांनी घसरून ३२,७५३.०९ वर आला. तर व्यापक टॉपिक्स निर्देशांक ०.८६ टक्के म्हणजेच २०.०६ अंकांनी घसरून २,३१२.२२ वर आला. (Stock Market Updates)
The post रेकॉर्डब्रेक तेजीला ब्रेक! सेन्सेक्स, निफ्टी घसरले appeared first on Bharat Live News Media.

Go to Source