वादळात बाळ उडाले; झाडावर पडून बचावले !

न्यूयॉर्क : भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांमध्ये त्याने अनेक राक्षसांना लहान वयातच ठार मारल्याच्या कथा आहेत. तृणावर्त नावाच्या एका राक्षसाने वावटळीचे रूप घेऊन बाळकृष्णाला आकाशात उडवून नेले होते. मात्र, हा तृणावर्तच श्रीकृष्णाच्या भाराने खडकावर कोसळून मेला आणि बाळरूपातील श्रीकृष्ण बचावला, अशी एक कथा आहे. ही कथा आठवण्याचे कारण म्हणजे, असेच एक छोटेसे बाळ अमेरिकेत वादळात उडाले; पण … The post वादळात बाळ उडाले; झाडावर पडून बचावले ! appeared first on पुढारी.

वादळात बाळ उडाले; झाडावर पडून बचावले !

न्यूयॉर्क : भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांमध्ये त्याने अनेक राक्षसांना लहान वयातच ठार मारल्याच्या कथा आहेत. तृणावर्त नावाच्या एका राक्षसाने वावटळीचे रूप घेऊन बाळकृष्णाला आकाशात उडवून नेले होते. मात्र, हा तृणावर्तच श्रीकृष्णाच्या भाराने खडकावर कोसळून मेला आणि बाळरूपातील श्रीकृष्ण बचावला, अशी एक कथा आहे. ही कथा आठवण्याचे कारण म्हणजे, असेच एक छोटेसे बाळ अमेरिकेत वादळात उडाले; पण झाडावर पडल्याने त्याचा जीव वाचला. आता या ‘सुपरबेबी’ची सर्वत्र चर्चा आहे.
अमेरिकेतील टेनेसीमध्ये चक्रीवादळाचे सायरन वाजले आणि लोक सुरक्षितस्थळी धावू लागले. तेथील क्लार्क्सविले येथे राहणार्‍या 22 वर्षांच्या सिडनी मूर नावाच्या महिलेच्या घराचे छत या वेगवान वादळामुळे उडाले. त्यामुळे घाबरलेल्या सिडनीने घाईघाईत आपला एक वर्षाचा चिमुरडा मुलगा प्रिन्स्टन याला घेऊन घराबाहेर पळ काढला. त्यावेळी तिचा चार महिन्यांचा मुलगा पाळण्यातच झोपला होता.
सिडनीचा जोडीदार ‘लॉर्ड’ नावाच्या आपल्या चिमुकल्याला घेण्यासाठी घरात परत गेला त्यावेळी तो पाळण्यात नसल्याचे त्याला दिसले. अचानक वादळ वाढले आणि घरांची छते, गाड्याही हवेत उडू लागल्या. मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि अनेक घरांच्या भिंतीही पडल्या. काही मिनिटांनंतर या जोडप्याला आपले बाळ तीस फूट अंतरावरील एका झाडावर अडकल्याचे दिसून आले. त्याचे कपडे फाटले होते आणि शरीरावर जखमेच्या खुणा होत्या. त्याला तत्काळ झाडावरून उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
The post वादळात बाळ उडाले; झाडावर पडून बचावले ! appeared first on Bharat Live News Media.

Go to Source