समुद्रात सापडले ‘काळे सोने’!

रोम : वैज्ञानिकांनी समुद्रात सुमारे 130 फूट खोलीवर ‘काळे सोने’ शोधले आहे. पाषाण युगाच्या काळात समुद्र प्रवास करीत असलेल्या चार हजार वर्षांपूर्वीच्या जहाजाच्या अवशेषांमध्ये ते सापडले. वास्तवात हे ‘काळे सोने’ म्हणजे ‘ओब्सीडियन’ आहे. ही थंड झालेल्या लाव्हापासून बनलेली काच असते. ‘ओब्सीडिय’चा उपयोग कटिंग टूल्स बनविण्यासाठी केला जातो. इटलीच्या कॅपरीमध्ये हे अवशेष शोधण्यात आले. या शोधामुळे कॅपरी … The post समुद्रात सापडले ‘काळे सोने’! appeared first on पुढारी.

समुद्रात सापडले ‘काळे सोने’!

रोम : वैज्ञानिकांनी समुद्रात सुमारे 130 फूट खोलीवर ‘काळे सोने’ शोधले आहे. पाषाण युगाच्या काळात समुद्र प्रवास करीत असलेल्या चार हजार वर्षांपूर्वीच्या जहाजाच्या अवशेषांमध्ये ते सापडले. वास्तवात हे ‘काळे सोने’ म्हणजे ‘ओब्सीडियन’ आहे. ही थंड झालेल्या लाव्हापासून बनलेली काच असते. ‘ओब्सीडिय’चा उपयोग कटिंग टूल्स बनविण्यासाठी केला जातो. इटलीच्या कॅपरीमध्ये हे अवशेष शोधण्यात आले.
या शोधामुळे कॅपरी आणि भूमध्य समुद्रातील प्राचीन जीवनाबाबत समजून घेण्यासही मदत होऊ शकते. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेला तप्त लाव्हा रस अतिशय वेगाने थंड होऊन गोठला की, ‘ओब्सीडियन’ बनते. कॅपरीच्या ग्रोटा बियांका या प्रसिद्ध सागरी गुहेच्या जवळ हे ‘काळे सोने’ सापडले. हे अवशेष गोळा करण्यासाठी 20 नोव्हेंबरलाच एक मोहीम सुरू करण्यात आली होती.
त्यामध्ये 28 बाय 20 बाय 15 सेंटिमीटर मापाच्या आठ किलोग्रॅम ओब्सीडियन कोअरचा छडा लावण्यात आला होता. आता या तुकड्याची सफाई केली जाणार आहे. वैज्ञानिकांच्या बर्‍याच शोधानंतरही आजपर्यंत भूमध्य सागरात नवपाषाण युगातील जहाजाचे अवशेष सापडले नव्हते. यापूर्वी सापडलेले सर्वात जुने अवशेष 2400 वर्षांपूर्वीच्या जहाजाचे आहेत. ते बल्गेरियाच्या तटापासून सुमारे 50 मैल अंतरावर काळ्या समुद्रात सापडले होते. ते एका ग्रीक व्यापारी जहाजाचे आहेत.
The post समुद्रात सापडले ‘काळे सोने’! appeared first on Bharat Live News Media.

Go to Source