दरीत वसलेल्या गावासाठी निर्माण केला कृत्रिम सूर्य
रोम : ‘गरज ही शोधाची जननी आहे,’ असे म्हटले जाते, ते खरेच आहे. गरजेपोटीच अनेक महत्त्वाचे शोध लावण्यात आलेले आहेत. अगदी सामान्य माणसेही गरजेपोटी भन्नाट ‘जुगाड’ करीत असतात. युरोपमध्ये उंच डोंगरांनी वेढलेल्या दरीत एक गाव वसले आहे. या गावात सूर्यप्रकाश पोहोचत नसल्याने एका व्यक्तीने लोकांच्या मदतीने असाच प्रयत्न करून चक्क ‘कृत्रिम सूर्य’ बनवला आहे.
स्वित्झर्लंड आणि इटलीच्या मध्ये एक गाव आहे. हे गाव चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले असल्यामुळे नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत येथे सूर्यप्रकाश येत नाही. या समस्येला तोंड देण्यासाठी गावातील लोकांनी असा उपाय शोधून काढला की, त्यांनी सूर्यप्रकाश गावाकडे वळवला. पृथ्वीचे असे काही भाग आहेत, जिथे अनेक महिन्यांपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नाही. सूर्यप्रकाश मानवासाठी खूप महत्त्वाचा आहे. परंतु, सूर्यप्रकाश पोहोचत नाही अशा ठिकाणी लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. विगनेला हे असेच एक गाव आहे, जिथे सूर्य उगवतो; पण तिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत सूर्यप्रकाश मंदावला की, गावात प्रकाश येत नाही. हे गाव चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे, त्यामुळे सूर्यप्रकाश गावात पोहोचत नाही.
सूर्यप्रकाशाचा अभाव ही या गावासाठी मोठी समस्या होती. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी या गावातील लोकांनी एक जबरदस्त जुगाड करून स्वतःचा कृत्रिम सूर्य बनवला. गावातील एका आर्किटेक्ट आणि इंजिनिअरने ही समस्या सोडवण्याचा मार्ग शोधून काढला, जेणेकरून गावाला सूर्यप्रकाश मिळू शकेल. 2006 मध्ये त्यांनी महापौरांच्या मदतीने 1 लाख युरो (भारतीय चलनात 89 लाख रुपये) जमा केले. या पैशाच्या मदतीने त्यांनी 40 चौरस किलोमीटर काच खरेदी केली आणि ती डोंगराच्या माथ्यावर बसवली.
हा 1.1 टनाचा आरसा डोंगरावर 1,100 मीटर उंचीवर बसवण्यात आला आहे, जेणेकरून त्यावर पडलेला सूर्यप्रकाश थेट गावाकडे परावर्तित होईल. परंतु, हा आरसा संपूर्ण गावाला प्रकाशमान करेल एवढा मोठा नव्हता, त्यामुळे त्याचा अँगल अशाप्रकारे सेट केला आहे की, तो गावातील एका मोठ्या चौकाचा भाग प्रकाशित करू शकेल. हा आरसा संगणकाद्वारे चालवला जातो, जो दिवसभर सूर्याच्या हालचालींचे अनुसरण करतो आणि त्या दिशेने फिरत राहतो. हा आरसा दिवसातील 6 तास सूर्यप्रकाश परावर्तित करतो, ज्यामुळे गावाचा काही भाग प्रकाशमय होतो.
The post दरीत वसलेल्या गावासाठी निर्माण केला कृत्रिम सूर्य appeared first on Bharat Live News Media.


Home ठळक बातम्या दरीत वसलेल्या गावासाठी निर्माण केला कृत्रिम सूर्य
दरीत वसलेल्या गावासाठी निर्माण केला कृत्रिम सूर्य
रोम : ‘गरज ही शोधाची जननी आहे,’ असे म्हटले जाते, ते खरेच आहे. गरजेपोटीच अनेक महत्त्वाचे शोध लावण्यात आलेले आहेत. अगदी सामान्य माणसेही गरजेपोटी भन्नाट ‘जुगाड’ करीत असतात. युरोपमध्ये उंच डोंगरांनी वेढलेल्या दरीत एक गाव वसले आहे. या गावात सूर्यप्रकाश पोहोचत नसल्याने एका व्यक्तीने लोकांच्या मदतीने असाच प्रयत्न करून चक्क ‘कृत्रिम सूर्य’ बनवला आहे. स्वित्झर्लंड …
The post दरीत वसलेल्या गावासाठी निर्माण केला कृत्रिम सूर्य appeared first on पुढारी.