भाच्याने पलंगावरुन ढकलल्याने मामाचा मृत्यू
नाशिक पंचवटी : Bharat Live News Media वृत्तसेवा- मामा – भाच्याच्या भांडणात मामाला जीव गमवावा लागल्याची घटना शुक्रवारी (दि.१५) हिरावाडीतील वाल्मीक आवास योजनेत घडली होती. पलंगावरुन ढकलल्याचे निमित्त ठरले अन् मामाचा जीव गेला. याप्रकरणी प्रथम पंचवटी पोलिसांनी शनिवारी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर संशयित भाच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
इंदुबाई खाणे (रा. साक्री) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित मच्छिंद्र सुखदेव मानभाव, (२७ रा. हिरावाडी, पंचवटी) हा दोन महिन्यापासून मामा बाबुलाल सोमा गावित यांच्याकडे राहत होता. भाऊ बाबुलाल गावित हे दोन दिवसांपासून मुलाला चटके लागले, त्याला दवाखान्यात नेण्यास पैसे नाही, पण दारु पिण्याकरीता पैसे आहे असे बोलल्याचा राग आल्याने संशयित मच्छिंद्र याने मामा बाबुलाल यांना पलंगावरुन जमिनीवर खाली पाडले व झाडाची कुंडी त्यांच्या छातीवर फेकून मारली. जबर मार लागल्याने ते बेशुद्ध पडले. नातेवाईकांनी बाबुलाल यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र डाॅक्टरांनी उपचारापुर्वी मयत घोषीत केले. पंचवटी पोलिसांनी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली, नंतर रात्री उशिरा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला. संशयिताला ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
हेही वाचा :
जळगाव : 20 किलोमीटर पायपीट करत आंबापाणीला पोहचणारे पहिले जिल्हाधिकारी ठरले आयुष प्रसाद
गुलमर्गचे तापमान उणे 2.8; माऊंट अबूचे उणे 1
आजपासून हुडहुडी वाढणार ! सर्वात कमी तापमान या शहरात
The post भाच्याने पलंगावरुन ढकलल्याने मामाचा मृत्यू appeared first on Bharat Live News Media.