सावधान…WHO ने श्‍वसन विकाराबाबत जारी केला अलर्ट

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : श्‍वसन विकार आणि कोरोनाच्‍या नवीन व्‍हेरियंट बाबत जागतिक आरोग्‍य संघटनेने (WHO) अलर्ट जारी केला आहे. कोरोना विषाणूचे स्‍वरुप बदलत असून सर्व देशांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे, असे WHO ने म्‍हटलं आहे. जागतिक आरोग्‍य संघटनेने कोविड-19 वरील तांत्रिक विभागाच्‍या मारिया व्हॅन केरखोव्ह यांचा सोशल मीडियावर या संदर्भातील एक व्हिडिओही शेअर केला आहे. … The post सावधान…WHO ने श्‍वसन विकाराबाबत जारी केला अलर्ट appeared first on पुढारी.

सावधान…WHO ने श्‍वसन विकाराबाबत जारी केला अलर्ट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : श्‍वसन विकार आणि कोरोनाच्‍या नवीन व्‍हेरियंट बाबत जागतिक आरोग्‍य संघटनेने (WHO) अलर्ट जारी केला आहे. कोरोना विषाणूचे स्‍वरुप बदलत असून सर्व देशांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे, असे WHO ने म्‍हटलं आहे.
जागतिक आरोग्‍य संघटनेने कोविड-19 वरील तांत्रिक विभागाच्‍या मारिया व्हॅन केरखोव्ह यांचा सोशल मीडियावर या संदर्भातील एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये श्वसनाचे विकार पसरण्याची कारणे सांगितली आहेत आणि त्यापासून बचाव करण्यासाठी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे, याचीही माहिती दिली आहे.
जगभरात श्‍वसना संबंधी विकार वाढत आहेत
केरखोवे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्‍हटलं आहे की, जगभरात श्‍वसना संबंधी विकार वाढत आहेत. यामध्‍ये कोरोना, फ्लू, राइनो व्हायरस, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि इतर रोगांचा समावेश आहे. SARS CoV-2 सतत स्वतःला बदलत आहे. कोरोनाचे सबवेरियंट JN.1 देखील पसरत आहे.

Respiratory diseases are increasing around the world due to a number of pathogens incl #COVID19, #flu, rhinovirus, mycoplasma pneumonia & others
SARS-CoV-2 continues to evolve. JN.1 (subvariant of BA.2.86) is already a VOI and continues to increase in circulation ⬇️ https://t.co/739wgCFlBz
— Maria Van Kerkhove (@mvankerkhove) December 17, 2023

गर्दीच्‍या ठिकाणी सरकारने लक्ष ठेवणे गरजेचे
श्‍वसन विकाराचा प्रसार होण्‍यास अनेक घटक कारणीभूत आहेत, सध्याचा हंगाम ख्रिसमसच्या सुट्टीचा आहे. त्‍यामुळे कुटुंबे सहलीच्‍या ठिकाणी गर्दी करतात. तसेच मोठ्या संख्येने प्रवासही केला जात आहे. असणार आहेत. यामुळेच कोरोना किंवा श्वसनाचे इतर आजार पसरण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सरकारने लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असेही आवाहन केरखोवे यांनी केले आहे.सध्या 68 टक्के कोरोना प्रकरणे सबवेरियंट JN.1 मुळे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगशी संबंधित नियमांची अंमलबजावणी करण्याचे आणि देखरेख ठेवण्याचे आवाहन केले आहे.
 
The post सावधान…WHO ने श्‍वसन विकाराबाबत जारी केला अलर्ट appeared first on Bharat Live News Media.

Go to Source