अर्थवार्ता
गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये अनुक्रमे एकूण 487.25 अंक व 1658.15 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 21,456.65 अंक तसेच 71,483.75 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 2.32 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 2.37 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. निफ्टीने प्रथमच 21,400 आणि सेन्सेक्सने 71 हजारांचा विक्रमी टप्पा ओलांडून साप्ताहिक बंदभाव (Wakly Close) दिला.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे भांडवल बाजारमूल्य (BSE Marketcup) 363 लाख कोटींवर पोहोचले. गतसप्ताहात बीएसईच्या भांडवल बाजारमूल्यात तब्बल 9 लाख कोटींची भर पडली. आयटी कंपन्यांच्या समभागांनी या सप्ताहात सर्वाधिक वाढ दर्शवली. सप्ताहात सर्वाधिक वाढ दर्शवणार्या कंपन्यांमध्ये एचसीएलटेक (9.3 टक्के), एल अँड टी माईंडट्री (7.4 टक्के), हिंडाल्को (7.1 टक्के), एनटीपीसी (7 टक्के), टेक महिंद्रा (6.6 टक्के) या समभागांचा समावेश होतो. सर्वाधिक घट होणार्या समभागांमध्ये भारत पेट्रोलियम (-4.6 टक्के), मारुती सुझुकी (-3.1 टक्के), डॉ. रेड्डीज लॅब (-3 टक्के), नेस्ले (-1.7 टक्के), सिप्ला (-1 टक्का) या कंपन्यांचा समावेश होतो. सलग निर्देशांक वाढ होण्याचा हा 7 वा आठवडा ठरला. अमेरिकेचे व्याजदर धोरण, परदेशी गुंतवणूकदारांचा वाढता ओघ तसेच विविध पतमानांकन संस्थांचे भारतीय अर्थ व्यवस्थेविषयीचे अनुकूल अहवाल हे घटक बाजार अत्युच्च पातळीवर जाण्यास कारणीभूत ठरले.
गतसप्ताहात अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हची पतधोरण आढावा बैठक झाली. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी लवकरच आणि अपेक्षेपेक्षा आधीच व्याजदर कपातीचे संकेत दिले. मागील वर्षभराच्या कालावधीत जागतिक स्तरावर महागाई वाढत असल्याने जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढवण्याचे सत्र चालू ठेवले होते. परंतु, आता हे चक्र संपून लवकरच मार्च 2024 पासून व्याजदर कपातीचे संकेत मिळतील. व्याजदर कपातीमुळे कर्जाचे व्याजदर घटून उद्योग चक्र गतीने फिरण्यास हातभार लागतो म्हणून व्याजदर कपात ही नेहमी भांडवल बाजारासाठी पोषक मानली जाते. अमेरिकेत व्याजदर कपात सुरू झाल्यास भारतीय मध्यवर्ती बँकदेखील व्याजदर कपात करेल या अपेक्षेने भारतीय भांडवल बाजारांनी उच्चांकी पातळी गाठली. त्यामध्येदेखील अमेरिकेशी व्यावसायिक संबंध असणार्या आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली.
नोव्हेंबर महिन्यात भारताची निर्यात 2.8 टक्के घटून 33.93 अब्ज डॉलर्स तसेच आयातदेखील 4.3 टक्के घटून 54.98 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली. यामुळे एकूण व्यापारतुटीचा आकडा पाहता व्यापार तूट ऑक्टोबर महिन्यातील 29.9 अब्ज डॉलर्सवरून घटून 20.58 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.
भारतीय चलन रुपया शुक्रवारच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत एकाच दिवसात 27 पैसे मजबूत होऊन 83 रुपये प्रतिडॉलर स्तरावर बंद झाला. 5 एप्रिलनंतर प्रथमच रुपया एका दिवसात एवढा मजबूत झाला. रोखे बाजारातदेखील 10 वर्षे कालावधीच्या रोख्यांचा भाव 10 बीपीएसने घसरून 7.1624 टक्के झाला. 5 मे रोजी संपलेल्या सप्ताहानंतर प्रथमच एका आठवड्यात रोखे बाजारात इतकी मोठी घसरण पहायला मिळाली. अमेरिकेत पुढील वर्षी व्याजदर कपातीचे संकेत मिळताच जगभरात रोखे बाजारात घसरण पाहायला मिळाली.
नोव्हेंबर महिन्यात 8 महिन्यानंतर प्रथम भारतातील घाऊक महागाई दर 0.26 टक्क्यांवर पोहोचला. या आधी मागील 7 महिने घाऊक महागाई दर ऋण (छशसरींर्ळींश) होता. अन्नधान्य क्षेत्राचा घाऊक महागाई दर मागील 3 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर म्हणजेच 4.69 टक्के झाला. तसेच किरकोळ महागाई दर (रिटेल इन्फ्लेशन) मागील तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर म्हणजेच 5.55 टक्क्यांवर पोहोचला.
भारतीय भांडवल बाजारात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणुकीत मोठी वाढ. नोव्हेंबर 2023 पर्यंत 11 महिन्यांत एसआयपीच्या माध्यमातून तब्बल 1 लाख 66 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली. एसआयपी माध्यमातून व्यवस्थापनअंतर्गत भांडवल मूल्यात यावर्षी 38 टक्क्यांची वाढ होऊन हे मूल्य 9 लाख 31 हजार कोटींवर पोहोचले. सध्या एसआयपी खात्यांची संख्या 7.44 कोटी इतकी आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत निव्वळ थेट कर संकलन (Net Direct Tax Collection) एकूण अर्थसंकल्पामध्ये घोषित अंदाजाच्या (Budget Estimate) 58.34 टक्के म्हणजेच 10 लाख 64 हजार कोटींवर पोहोचले. मागील आर्थिक वर्षाची याच काळाशी तुलना केल्यास कर संकलनामध्ये 23.4 टक्क्यांची वाढ पाहावयास मिळाली. याच काळात 2 लाख 3 हजार कोटींची करपरतावेदेखील देण्यात आले. यावर्षी एकूण 18 लाख 23 हजार कोटींचे कर संकलन होण्याचा अंदाज आहे.
अॅक्सिस बँकमधील प्रमुख गुंतवणूकदार बेन कॅपीटलने आपला 448 दशलक्ष डॉलर्सचा हिस्सा विकला. नोव्हेंबर 2017 मध्ये बेन कॅपीटलने अॅक्सिस बँकेत 68.54 अब्ज रुपयांचा हिस्सा विकत घेतला होता.
18 ते 22 डिसेंबरदरम्यान विविध कंपन्यांचे आयपीओ बाजारात येणार आहेत. एकूण 7 कंपन्यांचे 5,300 कोटींचे आयपीओ बाजारात नोंदणीसाठी खुले होतील, तर चार आयपीओचे समभाग बाजारात सुचीबद्ध होतील.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कृत्रिम याच नावाचे तंत्रज्ञान ओला कंपनीने बाजारात आणले. चॅट जीपीटी आणि बार्ड या कृत्रिम बुद्धीवर आधारित तंत्रज्ञानाला भारतीय कंपन्यांकडून आव्हान मिळत आहे. कृत्रिम हे तंंत्रज्ञान संस्कृत भाषेवर अवलंबून असून त्यामध्ये बेस आणि प्रो अशा दोन आवृत्त्या उपलब्ध होणार आहेत. एकूण 22 भाषांमध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे तंत्रज्ञान 10 भाषांमध्ये लिहूदेखील शकेल.
अपरिवर्तनीय डिबेंचर्सच्या माध्यमातून अदानी पोर्टर्सस कंपनी 5,250 कोटींचा निधी उभा करणार. यासाठी नुकतीच संचालक मंडळाने बैठकीत मान्यता दिली. रोखे आणि समभागांच्या माध्यमातून निधी उभारणी होणार.
8 डिसेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 2.816 अब्ज डॉलर्सनी वधारून 606.859 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. यापूर्वीच्या सप्ताहात गंगाजळीत 6.107 अब्ज डॉलर्सची भरघोस वाढ झाली होती.
The post अर्थवार्ता appeared first on Bharat Live News Media.
Home ठळक बातम्या अर्थवार्ता
अर्थवार्ता
गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये अनुक्रमे एकूण 487.25 अंक व 1658.15 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 21,456.65 अंक तसेच 71,483.75 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 2.32 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 2.37 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. निफ्टीने प्रथमच 21,400 आणि सेन्सेक्सने 71 हजारांचा विक्रमी टप्पा ओलांडून साप्ताहिक बंदभाव (Wakly Close) दिला. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे भांडवल बाजारमूल्य (BSE …
The post अर्थवार्ता appeared first on पुढारी.