‘मेकर इंडिया’च्या तीन फरारी संचालकांना अटक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गुंतवणूकदारांना सुमारे 56 कोटी 44 लाखांना गंडा घालून 6 वर्षांपासून फरार असलेल्या मेकर ग्रुप इंडियाच्या तीन संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी अटक केली. नारायण पांडुरंग खरजे (रा. कळंबोली, नवी मुंबई), गौतम हरिदास माने (हरेगाव, ता. औसा, जि. लातूर) व माधव निवृत्ती गायकवाड (वय 49, ससाणेनगर, हडपसर, पुणे) अशी त्यांची नावे आहेत. … The post ‘मेकर इंडिया’च्या तीन फरारी संचालकांना अटक appeared first on पुढारी.

‘मेकर इंडिया’च्या तीन फरारी संचालकांना अटक

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : गुंतवणूकदारांना सुमारे 56 कोटी 44 लाखांना गंडा घालून 6 वर्षांपासून फरार असलेल्या मेकर ग्रुप इंडियाच्या तीन संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी अटक केली. नारायण पांडुरंग खरजे (रा. कळंबोली, नवी मुंबई), गौतम हरिदास माने (हरेगाव, ता. औसा, जि. लातूर) व माधव निवृत्ती गायकवाड (वय 49, ससाणेनगर, हडपसर, पुणे) अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने संशयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी बजावली आहे.
कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्र व मुंबई, पुण्यात कोट्यवधीच्या फसवणुकीची व्याप्ती असलेल्या मेकर ग्रुप इंडियाचा प्रमुख, संचालक व अन्य अशा 23 जणांविरुद्ध 56 कोटी 44 लाख 831 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 8 डिसेंबर 2018 रोजी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी तीन संचालकांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. उर्वरित संशयित सहा वर्षांपासून फरार होते. त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे, असे आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.
आकर्षक परताव्याच्या बहाण्याने फसवणूक
कंपनीचा प्रमुख रमेश महादेव वळसे-पाटील (रा. आकुर्डी, पुणे), मनोहर संतराम अंबुलकर (वसई, जि, पालघर) याच्यासह अन्य संशयितांनी गुंतवणुकीवर आकर्षक परताव्यासह वेगवेगळ्या योजनांद्वारे आर्थिक लाभांचे आमिष दाखवून शाहूपुरी येथील चौथ्या गल्लीत 2010 मध्ये मेकर ग्रुप इंडियाचे कार्यालय थाटले होते. गुंंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून तसेच कमी काळात आकर्षक परताव्याच्या बहाण्याने संशयितांनी फिर्यादी संजय केरबा दुर्गे (रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) यांच्यासह गुंतवणूकदार व एजंटांना कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते.
परतावा देण्यापूर्वीच कंपनीने गाशा गुंडाळला!
गुंतवणुकीचा कालावधी संपूनही परताव्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करून कंपनीच्या प्रमुखासह संचालकांनी कंपनीचा गाशा गुंडाळला होता. गुंतवणूकदारांच्या तक्रारीनुसार कंपनीच्या प्रमुखांनी फसवणूक केल्याचे शाहूपुरी पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले होते. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता.
फरार संचालकांना लवकरच अटक
अन्य फरार संचालकांना लवकरच अटक करण्यात येईल, असे तपासाधिकारी रवींद्र कळमकर यांनी सांगितले. जेरबंद करण्यात आलेल्या संचालकांच्या घरांची झडती घेऊन कागदपत्रे हस्तगत करण्यात येत आहेत, असेही सांगण्यात आले.
The post ‘मेकर इंडिया’च्या तीन फरारी संचालकांना अटक appeared first on Bharat Live News Media.

Go to Source