अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग?
Bharat Live News Media ऑनलाईन : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत मोठी बातमी समोर आली आहे. दाऊद इब्राहिमला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी पत्रकारांनी केला आहे. त्याला सध्या कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी तसेच कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याला कुणी तरी विष दिल्याने त्याची प्रकृती गंभीर असून, तो रुग्णालयात दाखल झाल्याचे वृत्त रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. काही यूट्यूबर्सनीही आपापल्या चॅनेल्सवरून हे वृत्त दिले. तथापि, पाकिस्तानातील कुठल्याही अन्य माध्यमांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
सोशल मीडियावरील व्हायरल वृत्तात दाऊद कराचीतील एका रुग्णालयात कडक सुरक्षा व्यवस्थेत दाखल आहे. अलीकडील काळात पाकिस्तानात भारताला हवे असलेले अनेक मोस्ट वाँटेड गुन्हेगार मारले गेले आहेत. त्यांच्यातील काहींवर विष प्रयोगही झाले आहेत. शाहिद लतीफ, मुफ्ती कैसर फारूख, झिया ऊर रेहमान आदींचा त्यात समावेश आहे. ही यादी बरीच मोठी आहे. त्यामुळे आता दाऊदचाही त्यांच्याप्रमाणेच खात्मा केला जाईल, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे.
हेही वाचा :
भाजप प्रत्येक निवडणूक जिद्दीने लढतो : पी. चिदम्बरम
मुंबई : आमदार अपात्रताप्रकरणी आजपासून युक्तिवाद
‘संपूर्ण स्वच्छता मोहीम’ महाराष्ट्रभर विस्तारणार : मुख्यमंत्री
The post अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग? appeared first on Bharat Live News Media.