मुंबई : आमदार अपात्रताप्रकरणी आजपासून युक्तिवाद

मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर सोमवारपासून अंतिम युक्तिवाद सुरू होईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरील या सुनावणीत पुढील तीन दिवस हा युक्तिवाद होईल. सुरुवातीला ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत आणि त्यानंतर शिंदे गटाकडून वकील महेश जेठमलानी युक्तिवाद करतील. त्यासाठी दोन्ही गटांना साधारण दीड दिवसाचा कालावधी दिला जाणार आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान घेतलेल्या सुनावणीत 12 डिसेंबरला … The post मुंबई : आमदार अपात्रताप्रकरणी आजपासून युक्तिवाद appeared first on पुढारी.

मुंबई : आमदार अपात्रताप्रकरणी आजपासून युक्तिवाद

मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिकांवर सोमवारपासून अंतिम युक्तिवाद सुरू होईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरील या सुनावणीत पुढील तीन दिवस हा युक्तिवाद होईल. सुरुवातीला ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत आणि त्यानंतर शिंदे गटाकडून वकील महेश जेठमलानी युक्तिवाद करतील. त्यासाठी दोन्ही गटांना साधारण दीड दिवसाचा कालावधी दिला जाणार आहे.
हिवाळी अधिवेशनादरम्यान घेतलेल्या सुनावणीत 12 डिसेंबरला शिंदे गटाच्या पाच नेत्यांची साक्ष नोंदणी आणि उलटतपासणी झाली. दोन्ही गटांनी आतापर्यंत सादर केलेली कागदपत्रे, पुरावे, साक्षी आणि उलटतपासणीच्या आधारावर आता पुढील तीन दिवस युक्तिवाद केला जाणार आहे. शिंदे गटाने पक्षाचा अधिकृत व्हिप डावलून पक्षविरोधी कारवाई केली, त्यांचा सुरत-गुवाहाटी दौरा म्हणजे पक्षाचे सदस्यत्व सोडण्याचा प्रकार होता यावर ठाकरे गटाचा भर असण्याची शक्यता आहे.

The post मुंबई : आमदार अपात्रताप्रकरणी आजपासून युक्तिवाद appeared first on Bharat Live News Media.

Go to Source