कोल्हापूर : ध्वजदिन निधी संकलनात शाहूवाडी तालुका प्रथम; तहसीलदारांचा सत्कार

विशाळगड; पुढारी वृत्तसेवा : शाहुवाडी तालुक्यासाठी दीड लाख ध्वजदिन निधी वसुलीचे उद्दिष्ट असून हा सर्व पैसा सैनिकांसाठी वापरला जातो. या सामाजिक कार्यात शाहूवाडी तहसील कार्यालयाच्या महसूल विभागाने सहभाग नोंदवला असून तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ५ लाख ५० हजार अधिकचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. म्हणून अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते तहसीलदार रामलिंग चव्हाण, निवासी … The post कोल्हापूर : ध्वजदिन निधी संकलनात शाहूवाडी तालुका प्रथम; तहसीलदारांचा सत्कार appeared first on पुढारी.

कोल्हापूर : ध्वजदिन निधी संकलनात शाहूवाडी तालुका प्रथम; तहसीलदारांचा सत्कार

सुभाष पाटील

विशाळगड; Bharat Live News Media वृत्तसेवा : शाहुवाडी तालुक्यासाठी दीड लाख ध्वजदिन निधी वसुलीचे उद्दिष्ट असून हा सर्व पैसा सैनिकांसाठी वापरला जातो. या सामाजिक कार्यात शाहूवाडी तहसील कार्यालयाच्या महसूल विभागाने सहभाग नोंदवला असून तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ५ लाख ५० हजार अधिकचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. म्हणून अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते तहसीलदार रामलिंग चव्हाण, निवासी नायब तहसीलदार गणेश लव्हे यांचा सत्कार करण्यात आला. महसूलमध्ये सर्वात जास्त ध्वजदिन वसुलीचे उद्दिष्ट शाहूवाडी तहसील कार्यालयाने पूर्ण केले असून शाहूवाडी तालुका ध्वजनिधी संकलनात प्रथम आला असल्याची माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली.
आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक कायम कार्यरत असतात. या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने यामध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी निधी संकलन करणे, हे समाजातील मोठे योगदान आहे. आज याच सैनिकांमुळे आपण सुरक्षित असून सैनिकांच्या कुटुंबांची काळजी घेणे, ही आपली जबाबदारी असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. सशस्त्र सेना ध्वजदिनानिमित्ताने संकलित केलेला निधी सैनिक, माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा आणि मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येतो. यासाठी पुढाकार घेत शाहूवाडी तहसील विभागाने दीड लाख उद्दिष्ट असताना साडेपाच लाख ध्वजदिन निधी संकलन केले. देशकार्यासाठी मदत केल्याबद्दल अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते महसूल विभागाचा सत्कार करण्यात आला.
हेही वाचा :

कोल्हापूर : वडणगे येथे लोकसहभागातून साकारले क्रीडांगण
जत तालुक्याच्या दुष्काळाचा कलंक पुसणार : खा. पाटील
ठाणे : प्रेयसीला कारने चिरडण्‍याचा प्रयत्‍न, ‘एसआयटी’ चाैकशी हाेणार

The post कोल्हापूर : ध्वजदिन निधी संकलनात शाहूवाडी तालुका प्रथम; तहसीलदारांचा सत्कार appeared first on Bharat Live News Media.

Go to Source