कोल्हापूर : शिये-कसबा बावडा मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नागावच्या तरुणाचा मृत्यू

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : शिये-कसबा बावडा राज्यमार्गावर पंचागंगा नदी जवळ अज्ञात वहानाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या नागांवच्या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मयत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मयत तरूणाचे नाव अक्षय शितल सोळांकुरे ( वय २९ रा. नागांव ता. हातकणंगले ) असे आहे. तो कामानिमित्त आपल्या मोटरसायकल … The post कोल्हापूर : शिये-कसबा बावडा मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नागावच्या तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.

कोल्हापूर : शिये-कसबा बावडा मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नागावच्या तरुणाचा मृत्यू

शिरोली एमआयडीसी; Bharat Live News Media वृत्तसेवा : शिये-कसबा बावडा राज्यमार्गावर पंचागंगा नदी जवळ अज्ञात वहानाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या नागांवच्या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मयत झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
मयत तरूणाचे नाव अक्षय शितल सोळांकुरे ( वय २९ रा. नागांव ता. हातकणंगले ) असे आहे. तो कामानिमित्त आपल्या मोटरसायकल वरून कोल्हापूर येथे गेला होता. काम उरकून गावी येत असताना शनिवारी (दि. १६) रात्री १० वाजण्यासुमार पंचगंगा नदीशेजारी असणाऱ्या जुन्या टोल नाक्याजवळ काही नागरिकांना तो रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे डाॅक्टरानी सांगितले. अक्षय याच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने रक्तस्त्राव झाल्याने तो बेशुद्ध अवस्थेत पडला होता. अक्षय हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई व भाऊ असे दोघेजण आहेत. या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात करण्यात आली आहे.
The post कोल्हापूर : शिये-कसबा बावडा मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत नागावच्या तरुणाचा मृत्यू appeared first on Bharat Live News Media.

Go to Source