भारताने द. आफ्रिकेचा डाव ११६ धावांत गुंडाळला
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेला पहिला सामना आज (दि. 17) जोहान्सबर्ग येथे सुरु आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर मोठी धावसंख्या उभारण्याच्या मानसिकतेने आफ्रिकेचा संघ मैदानात उतरला. मात्र अर्शदीप सिंग आणि आवेश खानच्या भेदक माऱ्याने आफ्रिकेचा डाव केवळ ११६ धावांमध्ये गुंडाळला. वेगवान गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यापुढे आफ्रिकन फलंदाजांना अक्षरश: नांगी टाकली. (RSA vs IND 1st ODI)
भारताकडून, अर्शदीप सिंगने ५, आवेश खानने ४ आणि कुलदीप यादवने १ विकेट पटकावली. अर्शदीपने सातत्याने आफ्रिकेला धक्के दिले. त्यामुळे आफ्रिकन फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. फेकलुकवायो शिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी धावांचा टप्पा पार करता आला नाही.
आफ्रिकेकडून टोनी डी झॉर्झी २२ चेंडूमध्ये २८ धावा, एडन मार्कराम २१ चेंडूमध्ये १२ धावा, हेनरी क्लासेन ९ चेंडूमध्ये ६ धावा आणि डेव्हिड मिलरने ७ चेंडूमध्ये २ धावांचे योगदान दिले. भारताकडून अर्शदीप सिंगने ५ आणि आवेश खानने ४ विकेट्स पटकावल्या. आफ्रिकेच्या ३ फलंदाजांना भोपळाही फोडता आलेला नाही. रीझा हेंड्रिक्स, रॅसी वँडर ड्युसेन आणि विआन मल्डर हे ३ फलंदाज भोपळाही न फोडता बाद झाले. (RSA vs IND 1st ODI)
अर्शदीप, आवेश दोघांनाही होती हॅटट्रीकची संधी (RSA vs IND 1st ODI)
अर्शदीप आणि आवेश दोघांनीही आफ्रिकेला सलग दोन धक्के दिले. मात्र, त्यांना हॅटट्रीकमध्ये रुपांतर करता आले नाही. आफ्रिकेकडून रिझा हेंड्रक्स, रॅसी वँडर ड्युसेन आणि विल्यम मल्डर यांना भोपळाही फोडता आला नाही. रिझा हेंड्रक्स आणि रॅसी वँडर ड्युसेनला अर्शदीप सिंगने तंबूत धाडले. तर विल्यम मल्डरला आवेश खानने बाद केले आहे. (RSA vs IND 1st ODI)
हेही वाचलंत का?
MP CM Mohan Yadav on Mahakal : उज्जैनमध्ये रात्री ‘राजा’ राहत नाही! मध्य प्रदेशच्या नूतन मुख्यमंत्र्यांनी दिला अंधश्रद्धेला छेद
Manoj Jarange-Patil : मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही : मनोज जरांगे- पाटील
Bagheera Movie : समाज जंगल बनतो तेव्हा फक्त शिकारी न्यायासाठी…; मुरलीचा ‘बघीरा’ चा टिझर रिलीज
The post भारताने द. आफ्रिकेचा डाव ११६ धावांत गुंडाळला appeared first on Bharat Live News Media.