ज्येष्ठ संशोधिका, लेखिका डॉ. अंजली कीर्तने यांचे निधन

ठाणे: पुढारी वृत्तसेवा : चरित्रकार, संशोधिका आणि लेखिका डॉ. अंजली कीर्तने यांचे शनिवारी निधन झाले. त्या 70 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात त्यांच्या आई कवयित्री पद्मिनी बिनीवाले आणि मुलगा सलील आहे. त्यांच्या पार्थिवावर दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. Dr. Anjali Kirtane डॉ. कीर्तने यांचा जन्म 4 मे 1953 चा. पुण्याजवळील वालचंदनगरचा. त्यांना लेखन … The post ज्येष्ठ संशोधिका, लेखिका डॉ. अंजली कीर्तने यांचे निधन appeared first on पुढारी.

ज्येष्ठ संशोधिका, लेखिका डॉ. अंजली कीर्तने यांचे निधन

ठाणे: Bharat Live News Media वृत्तसेवा : चरित्रकार, संशोधिका आणि लेखिका डॉ. अंजली कीर्तने यांचे शनिवारी निधन झाले. त्या 70 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात त्यांच्या आई कवयित्री पद्मिनी बिनीवाले आणि मुलगा सलील आहे. त्यांच्या पार्थिवावर दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. Dr. Anjali Kirtane
डॉ. कीर्तने यांचा जन्म 4 मे 1953 चा. पुण्याजवळील वालचंदनगरचा. त्यांना लेखन आणि संशोधनाचा वारसा आई आणि सुप्रसिद्ध कवयित्री पद्मिनी बिनीवाले यांच्याकडून मिळाला. शाळेत त्यांनी अभिनयाबरोबरच त्यांनी भरतनाट्यम नृत्याचे रीतसर धडे घेतले. संगीतविश्वातदेखील रमल्या. सतारवादनाचे शिक्षण घेतले. नाशिकच्या भोसला मिलटरी स्कूलमध्ये जावून त्यांनी घोडेस्वारी, बंदूक चालवण्याचेही शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठात कला शाखेत मराठी विषय त्यांनी घेतला होता. मुंबई विद्यापीठात कला शाखेत त्या प्रथम आल्या होत्या. Dr. Anjali Kirtane
त्यांनी कविता, कथा, ललित लेखन, प्रवासवर्णन, चरित्रात्मक अशा प्रकारांत विपुल लेखन केले. त्यांच्या संशोधन कार्यामुळे त्यांना व्यापक प्रसिध्दी मिळवून दिली. डॉ. आनंदीबाई जोशी काळ आणि कर्तृत्व, बहुरुपिणी दुर्गा भागवत, दुर्गाबाई रूप शोध, गानयोगी पं द. वि. पलुस्कर, आठवणी प्रवासाच्या, ब्लोसम, पॅशन फ्लॉवर, (प्रवासवर्णन), माझ्या मनाची रोजनिशी (कादंबरी), पाऊलखुणा लघुपटाच्या (अनुभवकथन), लघुपटाची रोजनिशी, कॅलिडोस्कोप, हिरवी गाणी (कवितासंग्रह), वेडा मुलगा आणि शहाणी माकडे (बालकादंबरी), मनस्विनी प्रवासिनी (संशोधन-लेखसंग्रह) ही त्यांची काही पुस्तके प्रकाशित झाली होती. डॉ. कीर्तने यांनी भारतातील पहिली महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई जोशी, संगीताचे सुवर्णयुग (द. वि. पलुस्कर यांच्या जीवनावर लघुपट), साहित्यिका दुर्गा भागवत. या त्रयींवर लघुपटांची निर्मिती केली होती.
डॉ. कीर्तने यांना दादोबा पांडुरंग तर्खडकर’ सुवर्णपदक, मुंबई दूरदर्शन तर्फे मायलेकी पुरस्कार, शासनाचा सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार, मधुसूदन सत्पाळकर जीवनगौरव पुरस्कार, मॅजेस्टिकचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी तयार केलेल्या लघुपटांचाही अनेक पातळ्यांवर गौरव झाला होता. त्यांचे पती सतीश यांचे याच वर्षी मार्चमध्ये निधन झाल्याने त्या खूपच हळव्या झाल्या होत्या. पोटाच्या त्रासामुळे त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते.
हेही वाचा 

ठाणे : प्रेयसीला कारने चिरडण्‍याचा प्रयत्‍न, ‘एसआयटी’ चाैकशी हाेणार
ठाणे : कसारा रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी रुळावरुन घसरली; नाशिकसह मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत
ठाणे: श्री रामाच्या दर्शनसाठी मीरारोड येथील ३०० भक्त अयोध्याला पायी जाणार

The post ज्येष्ठ संशोधिका, लेखिका डॉ. अंजली कीर्तने यांचे निधन appeared first on Bharat Live News Media.

Go to Source