जळगाव : हद्दपार असलेल्या दोघांना विनापरवाना शस्त्रे बाळगल्याप्रकरणी अटक

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या दोघांवर विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अटक आहे. निशांत प्रताप चौधरी (वय २०, रा. शंकरराव नगर) आणि स्वप्निल उर्फ गोलु धर्मराज ठाकुर (वय २०, रा. शंकरराव नगर जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. या दोघांनाही जळगावमधून हद्दपार करण्यात आले होते. आज या दोघांना पोलिसांनी विनाकारण … The post जळगाव : हद्दपार असलेल्या दोघांना विनापरवाना शस्त्रे बाळगल्याप्रकरणी अटक appeared first on पुढारी.

जळगाव : हद्दपार असलेल्या दोघांना विनापरवाना शस्त्रे बाळगल्याप्रकरणी अटक

जळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या दोघांवर विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अटक आहे.
निशांत प्रताप चौधरी (वय २०, रा. शंकरराव नगर) आणि स्वप्निल उर्फ गोलु धर्मराज ठाकुर (वय २०, रा. शंकरराव नगर जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. या दोघांनाही जळगावमधून हद्दपार करण्यात आले होते. आज या दोघांना पोलिसांनी विनाकारण फिरताना पाहिले. पोलिसांना हे दोघे विनापरवाना शस्त्र वापरत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दोघांविरुद्ध शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप. निरी. दिपक जगदाळे, स. फौ. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. रामकृष्ण पाटील, पो.ना. सचिन पाटील, योगेश बारी, सुधीर सावळे, किशोर पाटील, पो.कॉ. मुकेश पाटील, नितीन ठाकुर, ललीत नारखेडे, राहुल रगडे, विशाल कोळी, छगन तायडे, किरण पाटील अशांनी केली आहे.
The post जळगाव : हद्दपार असलेल्या दोघांना विनापरवाना शस्त्रे बाळगल्याप्रकरणी अटक appeared first on Bharat Live News Media.

Go to Source