Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ठाण्यातील प्रेयसीला मारहाण प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. यातील प्रियकर अश्वजित गायकवाड याच्यासह तिघाजणांवर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आज (दि. १७) पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी याप्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करणार असल्याची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचे मुलगा अश्वजित गायकवाड याच्यावरील या आरोपांनंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे. या प्रकरणातील अधिक माहितीनुसार, ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ओव्हल कॉम्प्लेक्समध्ये अश्वजीतने गायकवाड या तरुणाने त्याची गर्लफ्रेंड प्रिया सिंह हिला कारने चिरडल्याची गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेत प्रिया सिंह ही तरुणी गंभीर जखमी झाली. अश्वजीत गायकवाड याने दोन मित्रांच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याचा आरोप पीडित प्रियाने केला आहे. सध्या प्रियावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे अश्वजीत गायकवाड हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC)चे संचालक अनिल गायकवाड यांचा पुत्र आहेत.
#WATCH | Thane, Maharashtra: On accused Ashwajit Anil Gaikwad allegedly running his car over his girlfriend, DCP Zone 5 Amarsingh Jadhav says, “An offence has been registered under section 279, 338, 323, 504, 34 IPC. A primary investigation has been done by the local police… pic.twitter.com/hCETrmTAyY
— ANI (@ANI) December 17, 2023
हेही वाचा
The post ठाणे : प्रेयसीला कारने चिरडण्याचा प्रयत्न, ‘एसआयटी’ चाैकशी हाेणार appeared first on Bharat Live News Media.