Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : संसद घुसखाेरी प्रकरणातील सूत्रधार ललित झा याने संसदेमध्ये तरुणांनी घुसखोरी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. तसेच पश्चिम बंगालमधील आपला मित्र सौरव चक्रवर्ती यांना हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करायला सांगितले होते, अशी माहितीसमोर येत आहे.
बुधवार, १३ डिसेंबर रोजी सागर शर्मा आणि मनोरंजन डी या दोन तरुणांनी लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीतून थेट सभागृहात उडी मारली होती. संसदेवर 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा 22 वा स्मृती दिना दिवशी झालेल्या धक्कादायक प्रकाराने संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी चव्हाट्यावर आल्याने देशभरात एकच खळबळ माजली आहे. याच वेळी अमोल शिंदे आणि नीलम देवी या दोघांनीसं सदेच्या आवाराबाहेर “तानाशाही नही चलेगी” अशी घोषणा देत धूराची कांडी फाेडली. पाचवा आरोपी ललित झा याने कथितरित्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर आंदोलनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
ललित झाने शेअर केला व्हिडिओ
संसद सुरक्षा भंग प्रकरणातील सूत्रधार ललित झा याने पश्चिम बंगालमधील आपल्या मित्रासोबत हल्ल्याचा व्हिडिओ शेअर केला होता. झा याने ‘जय हिंद’ म्हणण्यापूर्वी सौरव चक्रवर्तीला एका संदेशात व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यास सांगितले होते. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत चक्रवर्ती यांनी माहिती दिली की, ललित झा याला 14 मे पासून ओळखत होते. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी भेट झाली होती. झा यांच्या कृत्याबद्दल मला माहिती नव्हते, असा दावाही त्यांनी केला आहे.
“आम्ही फेसबुकवर भेटलो. तो सोशल मीडियावरील माझ्या पोस्टवर लाईक आणि कमेंट करत असे. माझ्या फेसबुक पोस्टमध्ये तो मला सपोर्ट करत असे. मी त्याला 14 मे पासून ओळखतो, पण त्याने मला या धर्तीवर कधीही काहीही सांगितले नाही, असेही ते म्हणाले. चक्रवर्ती म्हणाले की, त्यांनी अशी घटना भारताला स्वांतत्र्यापूर्वी घडली असती तर त्याचे समर्थन केले असते. आता अशा प्रकारच्या कृत्याची आवश्यकता नव्हती. लिलित झा हा सामाजिक न्याय आणि कल्याणाविषयी बोलत असे, असेही त्यांनी सांगितले. ललित झा याला पोलिसांना शरण आल्यानंतर अटक करण्यात आली. त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
The post संसद ‘घुसखोरी’चा व्हिडिओ ललित झाने शेअर केला, मित्रांना व्हायरल करायला सांगितला appeared first on Bharat Live News Media.
संसद ‘घुसखोरी’चा व्हिडिओ ललित झाने शेअर केला, मित्रांना व्हायरल करायला सांगितला