सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माच्या कारला अपघात
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लाडका भाईजान आणि बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा मेहुणा अभिनेता आयुष शर्माच्या ( Aayush Sharma ) कारचा अपघात झाला आहे. या अपघातावेळी सुदैवाने आयुष शर्मा कारमधये नव्हता, तर त्याचा एक ड्रायव्हर गाडी चालवत होता. ही घटना मुंबईतील खार जिम खान्याजवळ घडली आहे.
संबंधित बातम्या
Bagheera Movie : समाज जंगल बनतो तेव्हा फक्त शिकारी न्यायासाठी…; मुरलीचा ‘बघीरा’ चा टिझर रिलीज
लोकेश कनगराजने ‘या’ कारणाने घेतला ब्रेक; शाहरुखने नाकारला रजनीकांतचा ‘Thalaivar 171’
सलमानचं मेहुण्यासोबत बिनसलं?, आगामी चित्रपटातून आयुषची एक्झिट
झूम रिपोर्ट माहितीनुसार, अभिनेता आयुष शर्माचा ( Aayush Sharma ) कार ड्रायव्हर कार घेऊन मुंबईतील गॅस स्टेशनकडे जात होता. या दरम्यान एका मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या दुचाकी चालकाने त्याच्या कारला जोराची धडक दिली. या अपघातात अद्याप कोणीही जखमी झाले नसून आयुषच्या ड्रायव्हरची प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर आलेली आहे. अभिनेता आयुष हा सलमान खानची बहीण अर्पिता खान हिचा पती आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, आयुष शर्माने २०१८ साली ‘लव्हयात्री’ या चित्रपटातून पहिल्यांदा पदार्पण केलं आहे. याशिवाय तो शेवटचा सलमान खानसोबत ‘अंतिम’ या चित्रपटात दिसला होता. आता आयुष आगामी ‘रुसलान’ (Ruslaan) या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी १२ जानेवारी २०२४ रोजी रिलीज होणार आहे. आयुषने सलमानची बहीण अर्पिता खानशी लग्न केले असून दोघांना दोन मुले आहेत.
View this post on Instagram
A post shared by Aayush Sharma (@aaysharma)
The post सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माच्या कारला अपघात appeared first on Bharat Live News Media.