हिंगोली: दुघाळा, सावळी तांडा येथे लिगो प्रयोगशाळा उभारणीला वेग : पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार भूमीपूजन

हिंगोली : ब्रम्हांडातील गुरूत्वाकर्षणाच्या लहरींचा अभ्यास करण्यासाठी जगातील तिसरी तर भारतातील पहिली प्रयोगशाळा औंढा नागनाथ तालुक्यातील दुघाळा, सावळी तांडा, सिद्धेश्‍वर भागात प्रस्तावित आहे. या लिगो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 2600 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. सध्या येथे कार्यालय सुरू झाले असून येत्या दोन महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी बोलावण्याचा मानस खासदार हेमंत … The post हिंगोली: दुघाळा, सावळी तांडा येथे लिगो प्रयोगशाळा उभारणीला वेग : पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार भूमीपूजन appeared first on पुढारी.

हिंगोली: दुघाळा, सावळी तांडा येथे लिगो प्रयोगशाळा उभारणीला वेग : पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार भूमीपूजन

गजानन लोंढे

हिंगोली : ब्रम्हांडातील गुरूत्वाकर्षणाच्या लहरींचा अभ्यास करण्यासाठी जगातील तिसरी तर भारतातील पहिली प्रयोगशाळा औंढा नागनाथ तालुक्यातील दुघाळा, सावळी तांडा, सिद्धेश्‍वर भागात प्रस्तावित आहे. या लिगो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 2600 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. सध्या येथे कार्यालय सुरू झाले असून येत्या दोन महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी बोलावण्याचा मानस खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्‍त केला आहे. Hingoli News
या प्रकल्पाचे 11 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनेक शास्त्रज्ञ ऑनलाईन उपस्थित होते. Hingoli News
औंढा नागनाथ तालुक्यात लिगो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच 173.25 हेक्टर जमिन संपादित केली आहे. यासाठी लागणारी शासकीय कार्यवाही पूर्ण झाली आहे. ब्रम्हांडाचे गूढ उकलण्यास व संशोधनासाठी ही प्रयोगशाळा महत्वाची भूमिका बजावणार आहे. अमेरिकेच्या हान्सपोर्ट लिवींग स्टार येथे अशा प्रकारच्या दोन प्रयोगशाळा आहेत. तर तिसरी प्रयोगशाळा औंढा तालुक्यात स्थापन होत आहे. अत्यंत महत्वाचा प्रकल्प असल्याने 2012 मध्ये भारत सरकार व अमेरिकेदरम्यान या विषयावर चर्चा झाली.
गुरूत्व लहरींचा अभ्यास करणार्‍या फेड बहेजाद अशिरी व फॅड्रीक रब या दोन शास्त्रज्ञांसह पुणे येथील आयुका केंद्राचे तरूण स्वरदिप व शरद गावकर या चार प्रतिनिधींनी 18 नोव्हेंबर 2015 रोजी या परिसरात भेट देऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी केली होती. त्यानंतर ऑगस्ट 2016 मध्ये पुन्हा औंढा तालुक्यातील दुघाळा, गांगलवाडी शिवाराज स्थळ पाहणी करून उपयुक्‍त नोंदी घेतल्या होत्या. प्रकल्पासाठी 425 एकर जमीन शास्त्रज्ञांचे विश्रामगृह व निवासस्थानासाठी 25 एकर जमीन संपादित करण्यात आली. प्रकल्प परिसरातील जमिनीवर संरक्षक भिंत बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी दररोज 2 लाख लिटर पाणी लागणार असून 4 हजार किलो वॅट वीज पुरवठा लागणार आहे. सिध्देश्वर धरणावरून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना हाती घेतली जाणार आहे.
लिगो प्रयोगशाळेच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावून त्याच दिवशी हिंगोलीत विद्यार्थ्यांसाठी विज्ञान मेळावा घेण्यासाठी प्रयत्नशील  आहे. ही प्रयोगशाळा होणे जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब आहे. या भागातील पर्यटन व्यवसायासह इतर बाबींना चालना मिळण्यास मदत होणार आहे.  – खासदार हेमंत पाटील

हिंगोली : ‘आधी मराठा आरक्षण, नंतर शासकीय कार्यक्रम’ : वसमत तालुक्यातील गावातील नागरिकांची घोषणा
हिंगोलीच्या पथकाची कुणबी-मराठा नोंदींची तहसिलनिहाय शोध मोहिम
दुसरं लग्न केल्याप्रकरणी हिंगोलीतील पोलीस कर्मचारी बडतर्फ

The post हिंगोली: दुघाळा, सावळी तांडा येथे लिगो प्रयोगशाळा उभारणीला वेग : पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार भूमीपूजन appeared first on Bharat Live News Media.

Go to Source