बैलगाड्याचा थरार डोळ्यांचे पारणे फेडणारा : शरद पवार

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा अनेकदा टी.व्ही.वर व इतर माध्यमातून पाहिला पण बैलगाडा शर्यतीचा खरा अनुभव हा घाटात आल्यावरच कळतो हा अनुभव डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री,खासदार शरद पवार यांनी आळंदी जवळील चऱ्होली खुर्द (ता.खेड) येथील बैलगाडा घाटात व्यक्त केले. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच शरद पवार यांनी … The post बैलगाड्याचा थरार डोळ्यांचे पारणे फेडणारा : शरद पवार appeared first on पुढारी.

बैलगाड्याचा थरार डोळ्यांचे पारणे फेडणारा : शरद पवार

आळंदी : Bharat Live News Media वृत्तसेवा : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा अनेकदा टी.व्ही.वर व इतर माध्यमातून पाहिला पण बैलगाडा शर्यतीचा खरा अनुभव हा घाटात आल्यावरच कळतो हा अनुभव डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री,खासदार शरद पवार यांनी आळंदी जवळील चऱ्होली खुर्द (ता.खेड) येथील बैलगाडा घाटात व्यक्त केले. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच शरद पवार यांनी प्रत्यक्ष बैलगाडा घाटात बैलगाडा शर्यतीचा अनुभव घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘साहेब केसरी’ बैलगाडा शर्यतीचे आयोजन ‘मी सेवेकरी सोशल फाउंडेशन:चे संस्थापक सुधीर मुंगसे यांच्यावतीने करण्यात आले आहे. च-होली खुर्द येथील ‘साहेब केसरी’ बैलगाडा घाटात फायनल स्पर्धेसाठी स्वतः पवार उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे,माजी आमदार विलास लांडे,आयोजक सुधीर मुंगसे,बाजार समितीचे संचालक सोमनाथ मुंगसे,देवदत्त निकम,मंगलदास बांदल,उद्योजक विठ्ठल मणियार,खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अध्यक्ष हिरामण सातकर,किशोर दांगट,महाराष्ट्र केसरी दत्तात्रय गायकवाड,महान केसरी दिलीप माने,बाबाजी गवारी,देवेंद्र बुट्टे पाटील,अमोल पवार,पांडुरंग बनकर व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
हेही वाचा

Manoj Jarange-Patil : मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही : मनोज जरांगे- पाटील
कडाक्याची थंडी ठरणार रब्बीसाठी पोषक
दागिन्यांचे मास्टरपीस असलेले ब्रेसलेट!

The post बैलगाड्याचा थरार डोळ्यांचे पारणे फेडणारा : शरद पवार appeared first on Bharat Live News Media.

Go to Source