Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेता श्री. मुरली यांचा कन्नड आगामी ‘बघीरा’ ( Bagheera Movie ) हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. आता मोस्ट अवेटेड ‘बघीरा’ या चित्रपटाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये श्री. मुरली एका पोलीस अधिकाऱ्यासोबत सुपर हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन सीन आणि उत्तम कथा पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या
लोकेश कनगराजने ‘या’ कारणाने घेतला ब्रेक; शाहरुखने नाकारला रजनीकांतचा ‘Thalaivar 171’
Bagheera : KGF नंतर मोठी घोषणा, ‘बघीरा’ बॉलिवूडला देणार धक्का
Seema Sachdev Khan : सलमानच्या वहिनीनं सोहेल खानपासून घटस्फोटाआधीच बदललं नाव
अभिनेता श्री. मुरली यांच्या वाढदिवसानिमित्ताने आगामी ‘बघीरा’ ( Bagheera Movie ) चित्रपटाचा धमाकेदार टिझर निर्मात्यांनी रिलीज केला आहे. या टिझरमध्ये सुरूवातील पोलिसाच्या भूमिकेत मुरली सत्या शोधण्याच्या कामात गुंग असल्याचे दाखविले आहे. तर काही वेळाने यात एक मुलगी आगीत होरपळत असून ती जोरजोराने ओरडतानाही दाखविले आहे. यानंतर धमाकेदार अॅक्शन सीन, अनेक इमारती, जोरदार पाऊस, समुद्राच्या मध्यभागी जहाजात उभा असणारा मुरली, जाळपोळ, मारामारी आणि शेवटी मुरली एका काळ्या रंगाच्या कपड्यात सर्वांशी दोन हात करताना दिसतोय. दरम्यानच एक छोट्या मुलगा त्याला पाहून ‘बघीरा’ म्हणून जोरजोरात ओरडतो असेही दाखवण्यात आलं आहे.
होम्बले फिल्म्सच्या यूट्यूबवर ‘बघीरा’चा टीझर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जेव्हा समाज जंगल बनतो तेव्हा फक्त एक शिकारी न्यायासाठी गर्जना करतो, तो म्हणजे बघीरा. आमचे अत्यंत प्रतिभावान अभिनेते श्री. मुरली यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन, Homble Films ने Bagheera चा अधिकृत टीझर सादर केला आहे.’ चित्रपटाचा टीझर शेअर होताच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
‘बघीरा’ हा ‘केजीएफ १’, ‘कांतारा’ आणि ‘सालार’ चित्रपटाच्या निर्मात्यांचा एक आगामी कन्नड चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. सुरी यांनी केलं आहे. निर्माते प्रशांत नील, बी. अजनीश लोकनाथ यांचे संगीत आणि विजय किरगंडूर यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात अनेक कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
Birthday Boy Sri Murali has a special treat for fans! Here’s the First Look and Teaser of his upcoming film #Bagheera 🔥https://t.co/bPWQvegPTj
The film is written by #PrashanthNeel and is being directed by Dr Suri. Are you excited?@hombalefilms @SRIMURALIII @VKiragandur… pic.twitter.com/Z4XBW2ykNc
— Siddharth Kannan (@sidkannan) December 17, 2023
Instagram पर यह पोस्ट देखें
SriiMurali (@sriimurali) द्वारा साझा की गई पोस्ट
Instagram पर यह पोस्ट देखें
SriiMurali (@sriimurali) द्वारा साझा की गई पोस्ट
Instagram पर यह पोस्ट देखें
Hombale Films (@hombalefilms) द्वारा साझा की गई पोस्ट
The post समाज जंगल बनतो तेव्हा शिकारी…; मुरलीचा ‘बघीरा’ चा टिझर रिलीज appeared first on Bharat Live News Media.