लोकसभा घुसखोरीतील आरोपींचे जळालेले मोबाईल, कपडे राजस्थानमध्ये सापडले
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : संसदेतील घुसखोरी प्रकरणातील आरोपींचे मोबाईल फोन, कपडे आणि बूट यांचे जळलेले भाग दिल्ली पोलिसांनी राजस्थानमध्ये आज (दि.१७) जप्त केले. सर्व आरोपींचे फोन मास्टरमाइंड ललित झा याच्याकडे होते. त्याने आधी सर्व फोन तोडले आणि नंतर पेटवून दिले होते. दिल्ली पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Parliament Security Breach)
संबंधित बातम्या :
छत्तीसगडमध्ये सुरक्षारक्षक नक्षलवाद्यांमध्ये चकमक, पोलीस उपनिरीक्षक ठार
“आता ब्रह्मांडातील कोणतीही शक्ती ‘३७०’ पुन्हा आणू शकत नाही”
संसद सुरक्षा भंग प्रकरण दुर्दैवी आणि चिंताजनक : PM मोदी
पोलिसांनी शनिवारी महेश कुमावत या सहाव्या आरोपीला अटक केली आहे. महेश कुमावतला न्यायालयात सादर करण्यात आले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार ललित झा याला त्याने मदत केल्याचे सकृतदर्शनी दिसून आले आहे. या प्रकरणात दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. गुगलच्या माध्यमातून आरोपींनी संसदेच्या आजूबाजूच्या परिसराची रेकी केल्याचेही समोर आले आहे. (Parliament Security Breach)
पोलिसांनी न्यायालयात दावा केला की, आपल्या अन्यायकारक मागण्या सरकारकडून पूर्ण करवून घेण्यासाठी कुमावत याला इतर आरोपींच्या मदतीने देशात अराजक माजवायचे होते. सर्व आरोपींमध्ये झालेल्या जवळपास सर्व बैठकांना तो उपस्थित राहिला होता. मुख्य आरोपी ललित झा याच्यासोबत मोबाईल फोन आणि पुरावे नष्ट करण्याच्या कृत्यातही त्याचा सक्रिय सहभाग होता. महागाई, बेरोजगारी हे कारण लोकसभेतील घुसखोरीप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. संसद सुरक्षा भंगात बेरोजगारी आणि महागाई हे कारण असल्याचा आरोप त्यांनी केला. यावरून केंद्र सरकारवर त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन ताशेरे ओढले. (Parliament Security Breach)
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांची स्पेशल सेलकडून भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रताप सिम्हा यांचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यांनी सुरक्षेचा भंग करणाऱ्या दोघांना सभागृहात प्रवेश करण्यासाठी पास अधिकृत केले होते.
हेही वाचा :
अयोध्येत भाविकांना राहण्यासाठी टेंट सिटी, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी
पंतप्रधान मोदींनी केले सूरत डायमंड बाजाराचे उद्घाटन
पंतप्रधान मोदी आज करणार ‘सुरत डायमंड बोर्स’चं उद्घाटन
पाकमधील 300 दहशतवादी काश्मिरात घुसखोरीच्या तयारीत
The post लोकसभा घुसखोरीतील आरोपींचे जळालेले मोबाईल, कपडे राजस्थानमध्ये सापडले appeared first on Bharat Live News Media.