कुलूप नव्हे, भूलभुलय्या!
कॅलिफोर्निया : जगभरात एकापेक्षा एक सरस कलाकृतींचे नमुने काही कमी नाहीत. काही कलाकृती तर निव्वळ थक्क करणार्या असतात. सोशल नेटवर्कवर अशा कलाकृतींचे भरभरून कौतुकही केले जाते. आता चोरी ही जगभरातील समस्या आहेच. त्या पार्श्वभूमीवर, अतिमहत्त्वाच्या, किमती वस्तू बँकेत ठेवण्यावर भर दिला जातो. मात्र, पुरातन काळी असे केले जात नव्हते. त्यावेळी आपल्या महागड्या वस्तूही घरातच ठेवाव्या लागत असत आणि त्या पार्श्वभूमीवर, त्यावेळची सुरक्षा कशी कडेकोट होती, याचा उत्तम नमुना एका भूलभुलय्यासारख्या कुलपाच्या माध्यमातून चर्चेत आला आहे.
कितीही महागड्या वस्तू असल्या, तरी त्या सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे असायचे. त्या अनुषंगाने तिजोर्यांचे कुलूप इतके भरभक्कम केले जायचे की, ते कोणाला तोडताच येऊ नये. या पार्श्वभूमीवर एका पुरातन तिजोरीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.
ही तिजोरी 1840 मध्ये तयार करण्यात आली होती. इटलीतील कारागिरांनी ही सुंदर कलाकृती तयार केली होती, अशी माहिती याबाबत देण्यात आली आहे. या तिजोरीचे अनोखे वैशिष्ट्य म्हणजे, तीन चाव्या एकत्रित असतील तरच ते कुलूप उघडता येते. ही तिजोरी अतिशय सुंदर आहे. मात्र, त्यातील कुलपाचा भूलभुलैया पाहून त्यावर प्रतिक्रियांची बरसात झाली नसती, तरच नवल होते. एक यूझर म्हणाला, ज्याच्याकडे या कुलपाची चावी आहे, तो स्वत:ही काही वेळा हे कुलूप कसे उघडायचे, हे विसरत असेल!
The post कुलूप नव्हे, भूलभुलय्या! appeared first on Bharat Live News Media.
Home ठळक बातम्या कुलूप नव्हे, भूलभुलय्या!
कुलूप नव्हे, भूलभुलय्या!
कॅलिफोर्निया : जगभरात एकापेक्षा एक सरस कलाकृतींचे नमुने काही कमी नाहीत. काही कलाकृती तर निव्वळ थक्क करणार्या असतात. सोशल नेटवर्कवर अशा कलाकृतींचे भरभरून कौतुकही केले जाते. आता चोरी ही जगभरातील समस्या आहेच. त्या पार्श्वभूमीवर, अतिमहत्त्वाच्या, किमती वस्तू बँकेत ठेवण्यावर भर दिला जातो. मात्र, पुरातन काळी असे केले जात नव्हते. त्यावेळी आपल्या महागड्या वस्तूही घरातच ठेवाव्या …
The post कुलूप नव्हे, भूलभुलय्या! appeared first on पुढारी.