मुंबई इंडियन्समध्ये मोठी फूट? हार्दिक पंड्यामुळे संघात निर्माण झाला तेढ?

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mumbai Indians Captain Dispute : आयपीएल 2024 चा हंगाम सुरु होण्यास जेमतेम तीन महिने उरले आहेत. दरम्यान पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स कॅम्पमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याचे संकेत मिळत आहेत. एमआयने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माला हटवून हार्दिक पंड्याला संघाचा कर्णधार बनवले. ज्यामुळे या फ्रँचायझीच्या शेकडो चाहत्यांची तसेच संघातील सदस्यांची … The post मुंबई इंडियन्समध्ये मोठी फूट? हार्दिक पंड्यामुळे संघात निर्माण झाला तेढ? appeared first on पुढारी.

मुंबई इंडियन्समध्ये मोठी फूट? हार्दिक पंड्यामुळे संघात निर्माण झाला तेढ?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Mumbai Indians Captain Dispute : आयपीएल 2024 चा हंगाम सुरु होण्यास जेमतेम तीन महिने उरले आहेत. दरम्यान पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स कॅम्पमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याचे संकेत मिळत आहेत. एमआयने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माला हटवून हार्दिक पंड्याला संघाचा कर्णधार बनवले. ज्यामुळे या फ्रँचायझीच्या शेकडो चाहत्यांची तसेच संघातील सदस्यांची मने दुखावली आहेत.

Harry Brook vs Andre Russell : हॅरी ब्रूकने विंडिजच्या जबड्यातून विजय हिसकावला! शेवटच्या 6 चेंडूत 21 धावा फटकावल्या (Video)

दया.. कुछ तो गडबड है!
एमआयमध्ये हार्दिकचे पुनरागमन झाल्यानंतर सोशल मीडियावर सूर्यकुमारने हार्टब्रेकची इमोजी शेअर केली. अशी पोस्ट टाकणारा तो संघातील पहिला खेळाडू नाही. काही दिवसांपूर्वी, मुंबई इंडियन्सचा वरिष्ठ सदस्य जसप्रीत बुमराहने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. ज्यात त्याने ‘गप्प राहणे कधी कधी खूप चांगले उत्तर असते’, असे लिहिले होते. त्याच्या या पोस्टचा अर्थ हार्दिकच्या एमआयमधील घरवापसीशी जोडला गेला. (Mumbai Indians Captain Dispute)
सूर्यकुमार आयपीएल 2023 च्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाचा उपकर्णधार होता. पण त्याने रोहित शर्माच्या अनुपस्थितीत काही सामन्यांमध्ये कर्णधारपदही भूषवले होते. या प्रकरणावर माजी क्रिकेटपटू वसीम जाफर याने मत मांडत ‘असे काही खेळाडू होते ज्यांना एमआयचा कर्णधार होण्याची खूप आशा होती. सूर्यकुमार यादव हा त्यापैकी एक आहे. तो सध्या भारतीय टी-20 संघाचा कर्णधार आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकांमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. कर्णधार म्हणून तो परिपक्व होत आहे. अशातच आयपीएलमध्ये एमआयचे पूर्णवेळ नेतृत्व करण्याची त्याची इच्छा असू शकते. तो संधीच्या शोधात होता. पण फ्रँचायझीने हार्दिकला कर्णधार करून सर्वांनाच धक्का दिला आहे.
रोहितवर अन्याय झालाय का? (Mumbai Indians Captain Dispute)
रोहित शर्माने 2013 मध्ये पहिल्यांदा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवले. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2015 मध्ये हार्दिक पंड्याचे आयपीएल करिअर मुंबईतून सुरू झाले. वसीम जाफरने पुढे म्हटले की, ‘मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कसे काय इतक्यात कर्णधार पदावरून हटवले, याचे मला आश्चर्य वाटत आहे. हे इतक्या लवकर घडेल अशी कुणी कल्पनाही केली नसेल. एमआयने ऑल कॅश ट्रेडच्या माध्यमातून हार्दिकला आपल्या संघात सामील करून घेतले, तेंव्हा तो कर्णधार म्हणून पुनरागमन करेल असे सांगण्यात आले असेल. पण एकूण घडामोडींची माहिती रोहितला देण्यात आली होती की नाही, याबाबत मी ठोस सांगू शकत नाही. द. आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स म्हणतो, ‘हार्दिक पंड्या त्याच्या आयपीएल करिअरच्या सुरुवातीपासूनच मुंबईचा होता. संघात पुनरागमन झाल्यावर अशा नकारात्मक प्रतिक्रिया पाहून थोडे आश्चर्य वाटते.’
The post मुंबई इंडियन्समध्ये मोठी फूट? हार्दिक पंड्यामुळे संघात निर्माण झाला तेढ? appeared first on Bharat Live News Media.

Go to Source