जगभरातील एकमेव निशाचर वानर!

बोलिव्हिया : नाईट मंकी हे जगभरातील असे एकमेव वानर आहे, जे निशाचर आहे. ते घुबडाप्रमाणे रात्री जागते आणि दिवसभर झोपून काढते. या वानराचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे डोळे मोठे, दाट तपकिरी, नारंगी असतात आणि यामुळे त्याला रात्रीच्या अंधारातदेखील सर्व काही व्यवस्थित, बारीक नजरेने पाहता येते. या त्याच्या मोठ्या डोळ्यांमुळेच त्याला घुबडासारखे वानर म्हणून ओळखले जाते. नाईट … The post जगभरातील एकमेव निशाचर वानर! appeared first on पुढारी.

जगभरातील एकमेव निशाचर वानर!

बोलिव्हिया : नाईट मंकी हे जगभरातील असे एकमेव वानर आहे, जे निशाचर आहे. ते घुबडाप्रमाणे रात्री जागते आणि दिवसभर झोपून काढते. या वानराचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे डोळे मोठे, दाट तपकिरी, नारंगी असतात आणि यामुळे त्याला रात्रीच्या अंधारातदेखील सर्व काही व्यवस्थित, बारीक नजरेने पाहता येते. या त्याच्या मोठ्या डोळ्यांमुळेच त्याला घुबडासारखे वानर म्हणून ओळखले जाते.
नाईट मंकी प्रजातीत मोडली जाणारी ही वानरे अतिशय दुर्मीळ मानली जातात. ती केवळ रात्रीच संचार करत असल्याने फारशी दिसून येत नाहीत. दिवसभरात ती झाडांवर लपेटून आराम करताना दिसून येतात. त्यांचे डोळे अतिशय मोठे असतात आणि याचा त्यांना फायदाच होतो.
नाईट मंकीला ‘डौरोकोलिस’ या नावानेही ओळखले जाते. जगभरातील एकमेव निशाचर म्हणून त्यांची ओळख प्रस्थापित आहे. दिवसभर उन्हाखाली आराम करणे, ही त्यांची खासियत आहे. फळ, रस, किडे व छोटे कीटक टिपण्यासाठी ती रात्री बाहेर पडतात. मोठे डोळे, सपाट, गोल चेहरा, दाट केस असणारे ही वानरे अमेरिका, बोलिव्हिया, अर्जेंटिना व पॅराग्वे येथे आढळून येतात. त्यांचे आयुर्मान 13 ते 20 वर्षे इतके असू शकते.
The post जगभरातील एकमेव निशाचर वानर! appeared first on Bharat Live News Media.

Go to Source