ब्रूकने विंडिजच्या जबड्यातून विजय हिसकावला! शेवटच्या 6 चेंडूत 21 धावा फटकावल्या (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : Harry Brook vs Andre Russell : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिस-या टी-20 सामन्यात इंग्लंडने 7 गडी राखून विजय मिळवला. हा सामना अतिशय रोमांचक झाला. इंग्लंडच्या हॅरी ब्रुक आणि फिल सॉल्टने कॅरेबियन गोलंदाजांचा धुव्वा उडवला. अखेरच्या षटकात इंग्लिश संघाला विजयासाठी 21 धावांची गरज होती. ब्रूकने आपल्या वादळी खेळीच्या जोरावर 5 चेंडूतच विजयाचे लक्ष गाठले. … The post ब्रूकने विंडिजच्या जबड्यातून विजय हिसकावला! शेवटच्या 6 चेंडूत 21 धावा फटकावल्या (Video) appeared first on पुढारी.

ब्रूकने विंडिजच्या जबड्यातून विजय हिसकावला! शेवटच्या 6 चेंडूत 21 धावा फटकावल्या (Video)

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Harry Brook vs Andre Russell : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिस-या टी-20 सामन्यात इंग्लंडने 7 गडी राखून विजय मिळवला. हा सामना अतिशय रोमांचक झाला. इंग्लंडच्या हॅरी ब्रुक आणि फिल सॉल्टने कॅरेबियन गोलंदाजांचा धुव्वा उडवला. अखेरच्या षटकात इंग्लिश संघाला विजयासाठी 21 धावांची गरज होती. ब्रूकने आपल्या वादळी खेळीच्या जोरावर 5 चेंडूतच विजयाचे लक्ष गाठले. अशा प्रकारे पहिले दोन सामने गमावल्यानंतर जोस बटलरच्या संघाने जबरदस्त पुनरागमन केले आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत यजमान विंडिज 2-1 पुढे आहे.
इंग्लिश गोलंदाजांकडून निराशा
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीसाठी अनुकुल असणा-या खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. याचा पुरेपूर फायदा घेत वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 222 धावा केल्या. यादरम्यान निकोलस पुरनने 45 चेंडूत 82 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 6 षटकार मारले. तर रोव्हमन पॉवेलनेही झंझावाती 39 धावांचे योगदान दिले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली. सर्व गोलंदाजांनी 8 पेक्षा जास्त इकॉनॉमीसह धावा खर्च केल्या. सॅम कुरनने सर्वाधिक 2 बळी घेतले.
इंग्लंडकडून यशस्वीरित्या धावांचा पाठलाग
सामन्याच्या पहिल्या डावातील खराब कामगिरीनंतर इंग्लंडसमोर 120 चेंडूत 223 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करणे संघासाठी खूप कठीण काम होते. पण पहिल्याच चेंडूपासून त्यांनी विश्वविजेत्या संघाप्रमाणे लक्ष्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. सलामीवीर फिल सॉल्ट आणि जोस बटलर यांच्यात पहिल्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी झाली. यादरम्यान बटलरने 34 चेंडूत 51 धावांची खेळी केली. बटलरच्या विकेटनंतर, विल जॅक फक्त एक धाव करून बाद झाला. वेस्ट इंडिजने पुन्हा एकदा सामन्यात दमदार पुनरागमन केले, पण दुस-या टोकाला सॉल्ट वेगळ्याच मूडमध्ये होता. त्याने विंडिज गोलंदाजांचा दबाव झुगारून आणखी वेगवान फलंदाजी सुरू केली.
इंग्लिश चाहत्यांना मिळाला दिलासा
यादरम्यान त्याला 13 ते 18 व्या षटकांदरम्यान लियाम लिव्हिंगस्टोनकडून सुरेख साथ मिळाली. लिव्हिंगस्टोनने 166.66 च्या स्ट्राईक रेटने केवळ 18 चेंडूत तीन षटकार मारले आणि 30 धावा चोपल्या. 18व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर तो बाद झाला. ही विकेट पडल्याने सामन्यातील चुरस आणखीन वाढली. पण हॅरी ब्रुक मैदानात उतरताच त्याने विंडिज गोलंदांवर हल्लाबोल केला. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सॉल्ट एकटा नाही, असे जणू त्याने संकेत दिले. त्याच्या या तडाखेबाज खेळीने इंग्लिश चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला.
शेवटच्या दोन षटकाचा थरार
शेवटची दोन षटके शिल्लाक असताना इंग्लिश संघाला विजयासाठी 31 धावांची गरज होती. 19 वे षटक अल्झारी जोसेफने टाकले. या षटकात 10 धावा करण्यात इंग्लंडला यश आले. पण आता विजयासाठी शेवटच्या षटकात 21 धावा वसूल कराव्या लागणार होत्या. इंग्लंडचा पराभव होईल अशी चिन्हे दिसत होती. शेवटचे षटक टाकण्यासाठी आंद्रे रसेल पुढे आला. पण ब्रूकने वादळी खेळी करून विंडिजचा हा डाव हाणून पाडला. त्याने रसेलच्या पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या चेंडूंवर सलग दोन षटकार मारले. त्याच्या या आक्रमक खेळीने विंडिज कॅम्पमध्ये दहशत निर्माण झाली. ब्रुकने आपले आक्रमण सुरूच ठेवले. याने चौथ्या चेंडूही फटकावला पण यावेळी त्याला 2 धावा मिळाल्या. आता दोन चेंडूत तीन धावांची गरज होती. पाचवा चेंडू टाकण्यासाठी रसेल सरसावला. पण बेधकपणे हा चेंडू सीमारेषेच्या पलिकडे पाठला. याचबरोबर इंग्लंडच्या विजयावर 7 विकेट्स आणि एक चेंडू राखून शिक्कामोर्तब झाला.

That Harry Brook last over in all its glory.
Scintillating batting.#WIvENG pic.twitter.com/yYUCLep80H
— Wisden (@WisdenCricket) December 16, 2023

The post ब्रूकने विंडिजच्या जबड्यातून विजय हिसकावला! शेवटच्या 6 चेंडूत 21 धावा फटकावल्या (Video) appeared first on Bharat Live News Media.

Go to Source