नवीन अध्यक्षांसह सदस्यांच्या बैठकीची जागा हलली; नागपुरात होणार बैठक
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांसह सदस्यांनी तडकाफडकी राजीनामे दिल्यानंतर शासनाने या आयोगावर नवीन अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती केली आहे. या नवनियुक्त अध्यक्ष आणि सदस्यांची पहिली बैठक 19 डिसेंबर रोजी पुण्याऐवजी नागपूरात होणार आहे. वास्तविक पाहता हीच बैठक 22 डिसेंबर रोजी पुण्यात होणार होती. मात्र त्यामध्ये अचानक बदल करून तीन दिवस आधीच ही बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्य सरकारने आनंद निरगुडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शासनाने तातडीने निवृत्त न्यायाधीश सुनिल शुक्रे यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. दरम्यान नियोजनानुसार आयोगाची बैठक शुक्रवारी (दि. 22 ) रोजी पुण्यात होणार होती. मात्र, शुक्रे यांनी तीन दिवस आधीच ही बैठक बोलावली असून, विधिमंडळाचे अधिवेशन नागपूर येथे सुरू असल्याने तेथेच ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत मराठा समाजाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. राजीनामा दिलेल्या सदस्यांच्या जागी ज्योतीराम चव्हाण, मच्छिंद्रनाथ तांबे, डॉ. मारुती शिकारे आणि डॉ. ओमप्रकाश जाधव या सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
हेही वाचा
अनाथांच्या समस्यावर उपाययोजनांसाठी संशोधन समिती स्थापन
शिखर बँक घोटाळ्याच्या तपासाचा प्रगत अहवाल द्या
पाकमधील 300 दहशतवादी काश्मिरात घुसखोरीच्या तयारीत
The post नवीन अध्यक्षांसह सदस्यांच्या बैठकीची जागा हलली; नागपुरात होणार बैठक appeared first on Bharat Live News Media.