संपूर्ण राज्याला थंडीने भरली हुडहुडी; बहुतांश शहरांचा पारा 11 ते 12 अंशांवर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात तीव्र झाल्याने पारा 4 ते 8 अंशांवर खाली आल्याने महाराष्ट्रात यंदाच्या हिवाळ्यात थंडीची पहिली लाट आली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांचे किमान तापमान 11 ते 12 अंशांवर खाली आले आहे. शनिवारी राज्यात यवतमाळचे तापमान सर्वांत कमी 11.5 अंश इतके नोंदवले गेले. शुक्रवारपासून राज्यातील किमान तापमानात थंडी तीव्र … The post संपूर्ण राज्याला थंडीने भरली हुडहुडी; बहुतांश शहरांचा पारा 11 ते 12 अंशांवर appeared first on पुढारी.

संपूर्ण राज्याला थंडीने भरली हुडहुडी; बहुतांश शहरांचा पारा 11 ते 12 अंशांवर

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात तीव्र झाल्याने पारा 4 ते 8 अंशांवर खाली आल्याने महाराष्ट्रात यंदाच्या हिवाळ्यात थंडीची पहिली लाट आली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांचे किमान तापमान 11 ते 12 अंशांवर खाली आले आहे. शनिवारी राज्यात यवतमाळचे तापमान सर्वांत कमी 11.5 अंश इतके नोंदवले गेले. शुक्रवारपासून राज्यातील किमान तापमानात थंडी तीव्र होण्यास सुरुवात झाली. शनिवारी त्यात आणखी 2 ते 3 अंशांनी घट होण्यास सुरुवात झाली. आगामी पाच दिवस राज्यात थंडीची लाट अधिक तीव्र राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. शनिवारी विदर्भ, मध्य व उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा गारठला. कोकणातही किमान तापमान 23 वरून 19 अंशांवर खाली आले होते.
शनिवारचे किमान तापमान
यवतमाळ 11.5, पुणे 12, अहमदनगर 12.5, नाशिक 12.5, महाबळेश्वर 13.3, सातारा 13.5, छत्रपती संभाजीनगर 13.4, नागपूर 12.1, गोंदिया 12.4, वाशिम 12.6, चंद्रपूर 12.2, वर्धा 13, जळगाव 13.3, मालेगाव 14.4, सांगली 15.8, कोल्हापूर 15, सोलापूर 16.6, धाराशिव 15, परभणी 13.6, नांदेड 14, बीड 14.2, अकोला 14.4, अमरावती 14.3, बुलडाणा 13.5, ब्रह्मपुरी 13.6.
पमान 23 वरून 19 अंशांवर खाली आले होते.
हेही वाचा

दर पाच मुलींपैकी एकीचा होतोय बालविवाह
थंडीच्या प्रभावाने कोकणात हुडहुडी!
रिफायनरी प्रस्तावित जागीच होणार : नारायण राणे

The post संपूर्ण राज्याला थंडीने भरली हुडहुडी; बहुतांश शहरांचा पारा 11 ते 12 अंशांवर appeared first on Bharat Live News Media.

Go to Source