दर पाच मुलींपैकी एकीचा होतोय बालविवाह

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील पाच मुलींपैकी एक आणि सहा मुलांपैकी एक विवाहित असल्याची माहिती, ‘द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ’ जर्नलमध्ये भारतातील बालविवाहासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधन अहवालात समोर आली आहे. संशोधकांनी 1993 ते 2021 या कालावधीतील राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या पाच सर्वेक्षणांमधील डेटाचे विश्लेषण केले. 2016 ते 2021 या कालावधीत अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये … The post दर पाच मुलींपैकी एकीचा होतोय बालविवाह appeared first on पुढारी.

दर पाच मुलींपैकी एकीचा होतोय बालविवाह

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील पाच मुलींपैकी एक आणि सहा मुलांपैकी एक विवाहित असल्याची माहिती, ‘द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ’ जर्नलमध्ये भारतातील बालविवाहासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधन अहवालात समोर आली आहे. संशोधकांनी 1993 ते 2021 या कालावधीतील राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या पाच सर्वेक्षणांमधील डेटाचे विश्लेषण केले.
2016 ते 2021 या कालावधीत अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बालविवाहाची प्रथा कायम असल्याचेही अहवालात म्हटले असून, पंजाब, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये अल्पवयीन मुलींच्या विवाहाचे प्रमाण वाढले असल्याचे सांगितले. मणिपूर, पंजाब, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालसह 8 राज्यांत मुलींचे विवाह (18 वर्षांखालील मुलींचे विवाह) वाढले आहेत.
The post दर पाच मुलींपैकी एकीचा होतोय बालविवाह appeared first on Bharat Live News Media.

Go to Source