अंतरवाली सरांटी येथे जरांगे पाटील यांच्या बैठकीची जय्यत तयारी

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे १७ डिसेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षणाच्या सरकारला दिलेल्या २४ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे.अंतरवाली सराटीतील ज्या ठिकाणी मनोज जरांगे … The post अंतरवाली सरांटी येथे जरांगे पाटील यांच्या बैठकीची जय्यत तयारी appeared first on पुढारी.

अंतरवाली सरांटी येथे जरांगे पाटील यांच्या बैठकीची जय्यत तयारी

वडीगोद्री, Bharat Live News Media वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे १७ डिसेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षणाच्या सरकारला दिलेल्या २४ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे.अंतरवाली सराटीतील ज्या ठिकाणी मनोज जरांगे यांची ऐतेहासिक विराट भव्य सभा झाली होती त्याच ठिकाणी ही बैठक होणार असून सध्या या बैठकीच्या तयारीची जोरदार तयारी सुरू आहे.
सरकारने आरक्षणाच्या संदर्भात आतापर्यंत काय काय कारवाई केली ते सरकारने मराठा समाजाला सांगावे २४ डिसेंबरच्या अल्टिमेटच्या सरकारने आरक्षण द्यावे त्यानंतर सरकारने कोणतीही कारवाई केली नाही तर सरकारचा आमचा संबंध संपला सरकारने जे आश्वासन दिले होते त्या श्वासन सरकार पाळत नसेल तर सरकारचा आमचा संबंध संपला यानंतर कोणतीही चर्चा होणार नाही अशी आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेली आहे. या बैठकीमध्ये नेमका कोणता निर्णय घेतला जातो, पुढील आंदोलनाची काय दिशा ठरवली जाते याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
बैठकीचे स्वरूप
सकाळी नऊ वाजेपासून नाव नोंदणी सुरू होईल.त्यानंतर १२ वाजेपर्यंत सर्व समाज बांधवांचा परिचयाचा कार्यक्रम होईल. दुपारी बारा वाजता बैठकीला सुरुवात होईल. तीन या दरम्यान बैठकीच्या सुरुवात होणार असून या बैठकीमध्ये सरकारला दिलेल्या मदतीनंतर आंदोलनाची पुढील दिशा, धोरण व रणनिती ठरवण्यासाठी विचार मंथन होऊन दुपारी तीन वाजता एक मुखी निर्णय या बैठकीच्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याचे संयोजकाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
या बैठकीसाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात असेल अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.बैठकीसाठी ४०० पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. यामध्ये पोलीस अधीक्षक, अतिरीक्त पोलीस अधीक्षक,३ डीवायएसपी,२० पोलीस अधिकारी आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडीसह ४०० कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
भव्य मंडप व जेवणाची ही व्यवस्था..
या भव्य बैठकीच्या नियोजनासाठी २०० फूट लांब तर ६० फूट रुंद असा भव्य मंडप उभारण्यात आलेला असून येणाऱ्या सकल मराठा बांधवांच्या जेवणाची व नाश्त्याची व्यवस्था आयोजकाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
हे राहणार बैठकीला उपस्थित
राज्यभरातील साखळी आणि आमरण उपोषणकर्ते, आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या तरुणांच्या कुटुंबातील सदस्य, वकील,डॉक्टर, मराठा आंदोलक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
The post अंतरवाली सरांटी येथे जरांगे पाटील यांच्या बैठकीची जय्यत तयारी appeared first on Bharat Live News Media.

Go to Source