हिंगोली: केशव जोशी यांच्या बायोमेडिकल वेस्ट यंत्राला पेटंट
हिंगोली : पुढारी वृत्तसेवा: बायोमेडिकल वेस्ट ची विल्हेवाट पर्यावरण पूरक पद्धतीने करण्यासाठी संशोधक पुष्यमित्र केशव जोशी यांनी यंत्र तयार केले आहे. या यंत्राला नुकतेच भारत सरकारद्वारे पेटंट मंजूर करण्यात आले आहे. Keshav Joshi
संपूर्ण जगभरात आजघडीला बायोमेडिकल वेस्ट व त्याची विल्हेवाट हा भीषण प्रश्न आहे. भारतात दरदिवशी सुमारे ६१९ टन बायोमेडिकल वेस्ट ची निर्मिती होते. या कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी बायोमेडिकल वेस्ट इन्सिनरेटर हे यंत्र वापरण्यात येते. मात्र, या यंत्रावर अनेक देशांमध्ये बंदी आहे. पर्यावरणाला अपाय, पुनर्वापराची संधी उपलब्ध नसणे, आकाराने मोठे असणे आदी याच्या समस्या आहे. पुष्यमित्रने त्याच्या संशोधनातून बायोमेडिकल वेस्टच्या विल्हेवाटीसाठी पर्यावरण पूरक व पुनर्वापराला चालना देणाऱ्या यंत्राचा शोध लावला आहे. Keshav Joshi
यामध्ये कार्बन डायऑक्साइड चे रूपांतर कॅल्शियम कार्बोनेट (चुना) मध्ये केले जाते. तर धातूरुपातील बायोमेडिकल कचरा द्रवरुपात पुनर्वापरासाठी उपलब्ध केला जातो. त्याच्या या संशोधनाला अनेक ठिकाणी पुरस्कार मिळालेले आहेत. कोरोना काळात मास्कची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी १० वापरून झालेले मास्क घेऊन १ सॅनिटायझर भेट देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला होता. ज्याद्वारे वापरून झालेल्या मास्कची आपल्या संशोधित यंत्रात त्यांनी विल्हेवाट लावली. सध्या ५०-१०० किलो प्रति तास बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट करण्याची क्षमता असणारे हे यंत्र गरजेनुसार विविध क्षमतांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.
Keshav Joshi वयाच्या २५ व्या वर्षी इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सायन्स कम्युनिकेटर पदी नियुक्ती
केशव जोशी यांची नुकतीच इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सायन्स कम्युनिकेटर पदी निवड झाली आहे. देश विदेशातील ख्यातनाम वैज्ञानिक या सायन्स कम्युनिकेटर बैठकीत समाजोपयोगी संशोधनाची देवाणघेवाण करत असतात. जोशी हे आतापर्यंतचे सर्वात तरुण सायन्स कम्युनिकेटर ठरले आहेत.
हेही वाचा
हिंगोली : ‘आधी मराठा आरक्षण, नंतर शासकीय कार्यक्रम’ : वसमत तालुक्यातील गावातील नागरिकांची घोषणा
हिंगोली : मराठा आरक्षणासाठी पदवीधर तरूणाने संपवले जीवन
दुसरं लग्न केल्याप्रकरणी हिंगोलीतील पोलीस कर्मचारी बडतर्फ
The post हिंगोली: केशव जोशी यांच्या बायोमेडिकल वेस्ट यंत्राला पेटंट appeared first on पुढारी.
हिंगोली : पुढारी वृत्तसेवा: बायोमेडिकल वेस्ट ची विल्हेवाट पर्यावरण पूरक पद्धतीने करण्यासाठी संशोधक पुष्यमित्र केशव जोशी यांनी यंत्र तयार केले आहे. या यंत्राला नुकतेच भारत सरकारद्वारे पेटंट मंजूर करण्यात आले आहे. Keshav Joshi संपूर्ण जगभरात आजघडीला बायोमेडिकल वेस्ट व त्याची विल्हेवाट हा भीषण प्रश्न आहे. भारतात दरदिवशी सुमारे ६१९ टन बायोमेडिकल वेस्ट ची निर्मिती होते. …
The post हिंगोली: केशव जोशी यांच्या बायोमेडिकल वेस्ट यंत्राला पेटंट appeared first on पुढारी.