पुढारी ऑनलाईन डेस्क : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी २०२२ मध्ये केलेल्या सर्वांत मोठ्या नोकर कपातीबाबत मोठे विधान केले आहे. अल्फाबेटने 2022 मध्ये सुमारे 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. कंपनीच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी नोकरकपात आहे. दरम्यान, पिचाई यांनी एका बैठकीत या निर्णय योग्य होता असे म्हटले आहे.
कंपनीसाठी सर्वात कठीण निर्णय : सुंदर पिचई
नोकरकपात करण्याचा निर्णय कंपनीसाठी कठीण निर्णयांपैकी एक होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यावर मोठा परिणाम झाल्याचे पिचाई यांनी सांगितले. ‘आर्थिक अनिश्चिततेमुळे’ कंपनीने कपात करण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले की कंपनी “आपल्या संसाधनांचे सर्वात फायदेशीरपणे वाटप करू इच्छित आहे. कंपनीला अधिक कार्यक्षम बनायचे आहे. जर कंपनीने गेल्या वर्षी त्या नोकर्या कमी केल्या नसत्या तर नंतर आणखी वाईट निर्णय घेतला गेला असता.
‘नोकरकपात योग्य पद्धतीने करायला पाहिजे होती’
नोकरकपातीच्या प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्याचे पिचाई यांनी मान्य केले. ते म्हणाले की कंपनीने सर्व काढून टाकलेल्या कर्मचार्यांचा तात्काळ प्रवेश बंद करणे आणि एकाच वेळी सर्व काढून टाकलेल्या कर्मचार्यांना सूचित करणे थांबवायला हवे होते. अर्थात, हे करण्याचा हा योग्य मार्ग नाही, असेही पिचाई यांनी स्पष्ट केले.
“Difficult Decision”: Sundar Pichai On 12,000 Job Cuts At Google https://t.co/2bdgSovukz pic.twitter.com/84zq3D3g3E
— NDTV (@ndtv) December 16, 2023
हेही वाचलंत का?
Covid subvariant : केरळमध्ये आढळला कोविड-१९ चा सबव्हेरियंट; कोरोनातून बऱ्या झालेल्या महिलेला झाले संक्रमण
Suryakumar Yadav | रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सूर्यकूमारची पोस्ट चर्चेत
The post १२ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याबाबत पिचाई म्हणाले, “सर्वांत कठीण…” appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी २०२२ मध्ये केलेल्या सर्वांत मोठ्या नोकर कपातीबाबत मोठे विधान केले आहे. अल्फाबेटने 2022 मध्ये सुमारे 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. कंपनीच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी नोकरकपात आहे. दरम्यान, पिचाई यांनी एका बैठकीत या निर्णय योग्य होता असे म्हटले आहे. कंपनीसाठी सर्वात कठीण निर्णय : …
The post १२ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याबाबत पिचाई म्हणाले, “सर्वांत कठीण…” appeared first on पुढारी.