कोल्हापूर : पोलीस उपनिरीक्षक प्रतापराव भुजबळ यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर पोलीस दलातील उपनिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्या वाचक शाखेतील अधिकारी प्रतापराव जगन्नाथ भुजबळ (वय ५४) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने शनिवारी दुपारी निधन झाले. पोलीस मुख्यालयात आज (दि.१६) दुपारी ही घटना घडली. PSI Prataprao Bhujbal ड्युटीवर कार्यरत असताना उपनिरीक्षक भुजबळ यांच्या छातीत वेदना सुरू झाल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू … The post कोल्हापूर : पोलीस उपनिरीक्षक प्रतापराव भुजबळ यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू appeared first on पुढारी.

कोल्हापूर : पोलीस उपनिरीक्षक प्रतापराव भुजबळ यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर पोलीस दलातील उपनिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्या वाचक शाखेतील अधिकारी प्रतापराव जगन्नाथ भुजबळ (वय ५४) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने शनिवारी दुपारी निधन झाले. पोलीस मुख्यालयात आज (दि.१६) दुपारी ही घटना घडली. PSI Prataprao Bhujbal
ड्युटीवर कार्यरत असताना उपनिरीक्षक भुजबळ यांच्या छातीत वेदना सुरू झाल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती. दरम्यान, हृदयविकाराचा जोराचा धक्का आल्याने ते कोसळले. बेशुद्धावस्थेत त्यांना तातडीने खासगी आणि त्यानंतर शासकीय रुग्णालयात हालविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. PSI Prataprao Bhujbal
या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस दलामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपाधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली. सायंकाळी शवविच्छेदनानंतर तपासणीनंतर मृतदेह सातारा जिल्हाकडे त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आला.
हेही वाचा 

Subhash Chaugule : कोल्हापूर शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवपदी सुभाष चौगुले
कोल्हापूर : झाड अंगावर पडल्याने राधानगरी तालुक्यातील एकाचा मृत्यू
Subhedar Movie : सुभेदार सिनेमाची टीम कोल्हापूरकरांच्या भेटीला येणार

The post कोल्हापूर : पोलीस उपनिरीक्षक प्रतापराव भुजबळ यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू appeared first on पुढारी.

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर पोलीस दलातील उपनिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्या वाचक शाखेतील अधिकारी प्रतापराव जगन्नाथ भुजबळ (वय ५४) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने शनिवारी दुपारी निधन झाले. पोलीस मुख्यालयात आज (दि.१६) दुपारी ही घटना घडली. PSI Prataprao Bhujbal ड्युटीवर कार्यरत असताना उपनिरीक्षक भुजबळ यांच्या छातीत वेदना सुरू झाल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू …

The post कोल्हापूर : पोलीस उपनिरीक्षक प्रतापराव भुजबळ यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू appeared first on पुढारी.

Go to Source