नगर मनपात ‘सातवा’ लवकरच : आमदार संग्राम जगताप

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महापालिका कर्मचार्‍यांचा सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. कर्मचारी संघटनेने मुंबईत मंत्रालयावर मोर्चाही काढला होता. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आश्वासनानंतर तो अर्ध्या वाटेवरूनच परतला. आज (शुक्रवारी) पुन्हा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत पुन्हा बैठक झाली असून, त्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न … The post नगर मनपात ‘सातवा’ लवकरच : आमदार संग्राम जगताप appeared first on पुढारी.

नगर मनपात ‘सातवा’ लवकरच : आमदार संग्राम जगताप

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महापालिका कर्मचार्‍यांचा सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. कर्मचारी संघटनेने मुंबईत मंत्रालयावर मोर्चाही काढला होता. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आश्वासनानंतर तो अर्ध्या वाटेवरूनच परतला. आज (शुक्रवारी) पुन्हा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत पुन्हा बैठक झाली असून, त्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न निकाली निघेल, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. अहमदनगर महापालिका कर्मचारी सातवा वेतन आयोग व सीना नदी खोलीकरण या दोन विषयांवर उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अनिल पाटील, वित्त व जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव, नियोजन व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्यासोबत बैठक झाली.
या बैठकीला आमदार संग्राम जगताप, आयुक्त डॉ. पंकज जावळे, उपायुक्त श्रीनिवास कुर्‍हे, जलअभियंता परिमल निकम, प्रभारी शहर अभियंता मनोज पारखे, महादेव कोतकर, डी. डी. गायकवाड, मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंद लोखंडे, सचिव आनंद वायकर आदी उपस्थित होते. आमदार जगताप म्हणाले, की महापालिका कर्मचार्‍यांना गेल्या अनेक वर्षांपासून सातवा वेतन आयोग मिळालेला नाही. त्यासाठी कर्मचार्‍यांनी नगर ते मुंबई पायी लाँग मार्च काढला होता. सर्व कर्मचारी लाँग मार्चमध्ये सहभागी झाल्याने मनपाच्या कामकाजावर परिणाम झाला होता. त्यामुळे सातवा वेतन आयोग लागू व्हावा, यासाठी अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. आज नागपूर येथील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच मनपा कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू होईल.
सीना खोलीकरणासाठी निधी देऊ : पवार
अहमदनगर महापालिका कार्यक्षेत्रातून सुमारे 13 किलोमीटरचे सीना नदीचे पात्र आहे. नदीची हद्द निश्चित केली आहे. पात्रात गाळ असल्याने पावसाळ्यात पुन्हा पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. नदीचे खोलीकरण व रुंदीकरणासाठी मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळून निधी उपलब्ध व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत बैठक झाली. त्यावर लवकरच खोलीकरणासाठी निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याचे जगताप यांनी सांगितले.
हेही वाचा :

चायना मांजा विक्रीविरुद्ध श्रीरामपुरात पथक सज्ज
Pune News : घरातील वसतिगृहांना व्यावसायिक मिळकत कर!

The post नगर मनपात ‘सातवा’ लवकरच : आमदार संग्राम जगताप appeared first on पुढारी.

नगर : पुढारी वृत्तसेवा :  महापालिका कर्मचार्‍यांचा सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. कर्मचारी संघटनेने मुंबईत मंत्रालयावर मोर्चाही काढला होता. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आश्वासनानंतर तो अर्ध्या वाटेवरूनच परतला. आज (शुक्रवारी) पुन्हा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत पुन्हा बैठक झाली असून, त्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न …

The post नगर मनपात ‘सातवा’ लवकरच : आमदार संग्राम जगताप appeared first on पुढारी.

Go to Source