साडेसात तोळे सोन्यावर नोकराकडून डल्ला!
कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : नोकरानेच मालकाच्या घरातील साडेसात तोळे सोन्याचे दागिने चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार कोपरगावात उघडकीस आला. रुपेश सुनिल कोपरे (रा. संजयनगर) असे आरोपी नोकराचे नाव आहे. रतेश मदनलाल बडजाते यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नोकर असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. शहरातील काळेमळा रतेश मदनलाल बडजाते यांचे भांड्याचे दुकान आहे.
दोन महिन्यांपासून रुपेश सुनिल कोपरे हा त्यांच्याकडे नोकर म्हणून आला. रतेश बडजाते बाहेरगावी गेल्याने वडिल सांगतील ते काम करण्याचे रूपेशला सांगितले होते. बडजाते यांच्या घरीही भांड्याचा स्टॉक असल्याने रुपेशचे घरी ये-जा होती. वडिलांनी घरी असलेल्या स्टॉकमधून काही भांडी आणण्याचे रुपेशला 8 डिसेंबरला सांगितले. त्यावेळी घरात वयस्कर आई होत्या.
आईची नजर चकवून रुपेशने साडेसात तोळे पसार केले. 14 डिसेंबरला हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत गुन्हा नोंदविला. पोलिसांनी संशियत आरोपी रुपेश सुनिल कोपरे याला अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा :
Nashik News : पॉलिशच्या बहाण्याने सात तोळे सोने केले लंपास, अशोकनगर येथील घटना
अखेर शेवगाव तालुका दुष्काळी !
The post साडेसात तोळे सोन्यावर नोकराकडून डल्ला! appeared first on पुढारी.
कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : नोकरानेच मालकाच्या घरातील साडेसात तोळे सोन्याचे दागिने चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार कोपरगावात उघडकीस आला. रुपेश सुनिल कोपरे (रा. संजयनगर) असे आरोपी नोकराचे नाव आहे. रतेश मदनलाल बडजाते यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नोकर असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. शहरातील काळेमळा रतेश मदनलाल बडजाते यांचे भांड्याचे दुकान आहे. दोन महिन्यांपासून …
The post साडेसात तोळे सोन्यावर नोकराकडून डल्ला! appeared first on पुढारी.