“स्‍वार्थासाठी काही पण”, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना ठाकरे गटाने आज (दि. १६) धारावीमध्ये मोर्चा काढण्यात आला. धारावीच्या अदानी ग्रुपकडून करण्यात धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेने आक्रमक पाऊल उचलेले आहे. अदानी हटाओ धारावी बचाओ असा नारा देत कार्यकर्ते या मोर्चामध्ये सामील होत आहेत. या मोर्चासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे … The post “स्‍वार्थासाठी काही पण”, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा appeared first on पुढारी.
“स्‍वार्थासाठी काही पण”, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा


पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना ठाकरे गटाने आज (दि. १६) धारावीमध्ये मोर्चा काढण्यात आला. धारावीच्या अदानी ग्रुपकडून करण्यात धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेने आक्रमक पाऊल उचलेले आहे. अदानी हटाओ धारावी बचाओ असा नारा देत कार्यकर्ते या मोर्चामध्ये सामील होत आहेत. या मोर्चासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे विविध नेते सामील झालेले आहेत. या संदर्भाने भाजपा नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Thackeray vs Rane)
Thackeray vs Rane : यांचे खरे प्रेम टी. डी. आर. च्‍या मलईवर….
भाजप नेते नारायण राणे यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत ठाकरे गटाने धारावीमध्ये काढत असलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे,  राणे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,
“उध्‍दव ठाकरे व त्‍यांच्‍या नादी लागून कॉंग्रेस व इतर पक्ष अदानी उद्योग समुहा विरोधात आता धारावीमध्‍ये मोर्चा काढताहेत. दुसरीकडे उध्‍दव ठाकरेंचे बगलबच्‍चे आदरणीय साहेबांच्‍या जीवावर उठलेल्‍या पाकिस्‍तानातील दाऊदच्‍या साथीदाराबरोबर पार्टीमध्‍ये नाचत आहेत. वा रे उध्‍दव ठाकरे ! मुख्‍यमंत्री असताना अडीच वर्षात धारावीकरांना उध्‍दव ठाकरे पाचशे चौरस फुटांचे घर देण्‍याचा निर्णय घेऊ शकले नाहीत. आता त्‍यासाठी मोर्चा. सत्‍तेत असताना अडीच वर्षात तुम्‍ही का नाही दिले धारावीकरांना पाचशे चौरस फुटांचे घर ? यांचे प्रेम धारावी आणि धारावीकरांवर नाही. यांचे खरे प्रेम टी. डी. आर. च्‍या मलईवर आहे. उध्‍दव ठाकरे यांना ना नीती, ना नितीमत्‍ता ! स्‍वार्थासाठी काही पण !!

उध्‍दव ठाकरे व त्‍यांच्‍या नादी लागून कॉंग्रेस व इतर पक्ष अदानी उद्योग समुहा विरोधात आता धारावी मध्‍ये मोर्चा काढताहेत. दुसरीकडे उध्‍दव ठाकरेंचे बगलबच्‍चे आदरणीय साहेबांच्‍या जीवावर उठलेल्‍या पाकिस्‍तानातील दाऊदच्‍या साथीदाराबरोबर पार्टीमध्‍ये नाचत आहेत. वा रे उध्‍दव ठाकरे !…
— Narayan Rane (@MeNarayanRane) December 16, 2023

धारावी आमची हक्काची, नाही सरकारच्या मित्रांची! धारावीकरांचा एल्गार, अदानीवर वार । विराट मोर्चा । मुंबई – #LIVE https://t.co/aWUfp2jIws
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 16, 2023

हेही वाचा 

‘Donate for Desh’: कॉंग्रेसकडून देशव्यापी देणगी अभियान ‘डोनेट फॉर देश’
Devendra Fadnavis : मराठा समाजाच्या आरक्षणाला शरद पवारांचा सर्वाधिक विरोध : देवेंद्र फडणवीस
India-Oman Partnership | ‘भारत- ओमान’चे द्वीपक्षीय संबंध आणखी मजबूत; जाणून घ्या दोन्ही देशांतील संबंधांविषयी
धारावी प्रकल्पाच्या अटी-शर्ती उद्धव ठाकरे सरकारनेच ठरविल्या : देवेंद्र फडणवीस
धारावी प्रकल्पावरून सभागृहात सरकारला घेरणार : अंबादास दानवे
‘धारावीच्या नागरिकांनी मातोश्रीवर मोर्चा नेला तर मी…’ मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

The post “स्‍वार्थासाठी काही पण”, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना ठाकरे गटाने आज (दि. १६) धारावीमध्ये मोर्चा काढण्यात आला. धारावीच्या अदानी ग्रुपकडून करण्यात धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेने आक्रमक पाऊल उचलेले आहे. अदानी हटाओ धारावी बचाओ असा नारा देत कार्यकर्ते या मोर्चामध्ये सामील होत आहेत. या मोर्चासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे …

The post “स्‍वार्थासाठी काही पण”, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा appeared first on पुढारी.

Go to Source