पिंपरी : महापालिकेला आली जाग; सुरू करणार बर्न वॉर्ड

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेने जळितग्रस्तांवर तातडीने उपचार व पुनर्वसन करण्यासाठी एक सुसज्ज जळीत रुग्ण उपचार कक्ष (बर्न वॉर्ड) स्थापन करण्याची कार्यवाही सुरू केली आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शुक्रवारी (दि.15) सांगितले. हा वॉर्ड 15 ते 30 बेडचा असणार आहे. कोणत्या रुग्णालयात बर्न वॉर्ड सुरू करणार हा निर्णय आयुक्त … The post पिंपरी : महापालिकेला आली जाग; सुरू करणार बर्न वॉर्ड appeared first on पुढारी.

पिंपरी : महापालिकेला आली जाग; सुरू करणार बर्न वॉर्ड

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेने जळितग्रस्तांवर तातडीने उपचार व पुनर्वसन करण्यासाठी एक सुसज्ज जळीत रुग्ण उपचार कक्ष (बर्न वॉर्ड) स्थापन करण्याची कार्यवाही सुरू केली आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शुक्रवारी (दि.15) सांगितले. हा वॉर्ड 15 ते 30 बेडचा असणार आहे. कोणत्या रुग्णालयात बर्न वॉर्ड सुरू करणार हा निर्णय आयुक्त प्रत्यक्ष पाहणी करून घेणार आहेत.
तळवडे येथील स्पार्कल फायर कॅण्डल कारखान्यास लागलेल्या आगीत आतापर्यंत 11 महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर, 5 महिला कामगारांवर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या दुर्घटनेनंतर शहरातील लोकप्रतिनिधींसह विविध संघटना व संस्थांनी महापालिकेचे बर्न वॉर्ड व बर्न रुग्णालय उभारण्याची आग्रही मागणी केली होती. तसेच, नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही महापालिकेस तशा सूचना देण्यात आल्या होत्या. ‘पुढारी’नेही शहराला बर्न वॉर्डची गरज असल्यासंदर्भात सातत्याने वृत्त दिले आहेत. अखेर त्याची दखल घेऊन महापालिकेने तात्काळ बर्न वॉर्ड सुरू करण्याची कार्यवाही तीव्र केली आहे.
आयुक्त सिंह यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय विभागाच्या अधिकार्‍यांसोबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत प्रस्तावित बर्न वॉर्डची संभाव्य जागा, दर्जा व क्षमता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता डॉ. ज्ञानदेव जुंधारे, यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार आदी उपस्थित होते.
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गोफणे यांनी बर्न वॉर्डची रचना आणि तेथील आवश्यक सुविधा, मनुष्यबळ आदींबाबत सादरीकरण केले.
महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून योग्य रुग्णालयाच्या जागेबाबत त्वरित अहवाल सादर करावा, असे निर्देश आयुक्त सिंह यांनी दिले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर शहरातील योग्य रुग्णालयात इमारतीमध्ये बर्न वॉर्ड सुरू करण्यात
येणार आहे. प्रस्तावित बर्न वॉर्डमध्ये आगीमुळे दुर्घटनाग्रस्त झालेल्या रुग्णांवर उपचार आणि त्यांचे पुनर्वसन करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी महापालिका रुग्णालयांच्या संरचनेमध्ये फेरबदल, नूतनीकरण किंवा सुधारणा करण्यात येणार आहे.
यामध्ये आवश्यक मनुष्यबळ व अत्याधुनिक उपकरणे खरेदी करण्यासाठीही गुंतवणूक करण्यात येणार आहे. रुग्णांना पाठपुरावा आणि पुनर्वसन सेवादेखील पुरविली जाणार आहे. महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणार्या बर्न वॉर्ड खाटांची क्षमता 15 ते 30 असतील. खाटांच्या क्षमतेबाबत पुढील आढावा बैठकीत सविस्तर निर्णय घेण्यात येणार आहे. बर्न वॉर्डसाठी निवडलेल्या ठिकाणाची पाहणी आयुक्तांकडून करण्यात येणार आहे.
हेही

लग्न झाल्यानंतर मध्यरात्री नवरी पसार
‘चासकमान’मधून रब्बीचे पहिले आवर्तन
Jalgaon News : 11 नगरपालिकांतून 51 लाखाचा कर वसूल

The post पिंपरी : महापालिकेला आली जाग; सुरू करणार बर्न वॉर्ड appeared first on पुढारी.

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेने जळितग्रस्तांवर तातडीने उपचार व पुनर्वसन करण्यासाठी एक सुसज्ज जळीत रुग्ण उपचार कक्ष (बर्न वॉर्ड) स्थापन करण्याची कार्यवाही सुरू केली आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शुक्रवारी (दि.15) सांगितले. हा वॉर्ड 15 ते 30 बेडचा असणार आहे. कोणत्या रुग्णालयात बर्न वॉर्ड सुरू करणार हा निर्णय आयुक्त …

The post पिंपरी : महापालिकेला आली जाग; सुरू करणार बर्न वॉर्ड appeared first on पुढारी.

Go to Source