पन्नाशीत आहार, वजन, व्यायाम ठेवा नियंत्रित; पुरुषांना हृदयविकाराचा धोका अधिक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही वर्षांत ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचे प्रमाण वाढले आहे. अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरुवारी हृदयविकाराचा झटका बसल्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या भारतीय पुरुषांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण ५० टक्के असल्याची माहिती इंडियन हार्ट असोसिएशनने दिली आहे. चाळीशीच्या पुढे वय … The post पन्नाशीत आहार, वजन, व्यायाम ठेवा नियंत्रित; पुरुषांना हृदयविकाराचा धोका अधिक appeared first on पुढारी.

पन्नाशीत आहार, वजन, व्यायाम ठेवा नियंत्रित; पुरुषांना हृदयविकाराचा धोका अधिक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही वर्षांत ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचे प्रमाण वाढले आहे. अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरुवारी हृदयविकाराचा झटका बसल्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या भारतीय पुरुषांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण ५० टक्के असल्याची माहिती इंडियन हार्ट असोसिएशनने दिली आहे.
चाळीशीच्या पुढे वय गेलेल्यांनी केवळ आहारच नव्हे तर झेपेल एवढाच व्यायाम करावा आणि वजन नियंत्रित ठेवावे, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. प्रसिद्ध हृदयविकार (Heart Attack) तज्ज्ञांनी सांगितले की, आर्थरिजमध्ये जमा होणाऱ्या प्लाकमुळे कधीही हृदयविकाराचा झटका येवू शकतो. लहान क्लॉट्स फार धोकादायक नसतात. परंतु, जागेवरून विलग होतात आणि आर्थरिज भिंतींना क्षतिग्रस्त करतात यावेळी काही वेळातच ब्लड क्लॉचिंग होऊन मोठे ब्लॉकेजेस तयार होऊ शकतात. उदाहरणार्थ रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या झुडपांचा वाहतुकीवर परिणाम होत नाही. परंतु, ही झुडपे रस्त्यांवर आली तर वाहतुक कोंडी होऊ शकते. हृदयविकाराचा झटका असाच येतो.
भारतीय पुरुषांवर केलेल्या एका अभ्यासात आढळून आले आहे की, पश्चिम देशांच्या तुलनेत भारतीय पुरुषांना आधीच्या पिढीच्या व्याधी जास्त बळावतात. हृदयविकाराचेही (Heart Attack) असेच आहे. आधीच्या पिढीला हृदयविकाराचा त्रास असेल तर तो पुढील पिढीत जाणवण्याची शक्यता जास्त असते. भारतीय पुरुषांमध्ये चाळीशी किंवा त्यापूर्वी हृदयविकार किंवा अंजायना याचा धोका जास्त असतो. बॅड कॅलेस्ट्रॉल जमा होण्याचे प्रमाण भारतीय पुरुषांत जास्त आहे. केवळ आहारच नाही तर शारीरिक कमतरतेमुळेही हे घडते. डायबेटीज किंवा हायपरटेंशन यामुळेही गुंतागुंत वाढते. जीवनशैलीशी निगडित बाबीही कारणीभूत ठरतात.
ठराविक लक्षणे नाहीत
हृदयविकाराचा झटका अॅसिडिटी, नर्व्ह किंवा गॅस्ट्रीक त्रासातूनही येवू शकतो. ईसीजी, इको आणि स्ट्रेस चाचणी यातूनही आर्थरिजची स्थिती कळत नाही. सीटी-कोरोनरी अँजिओग्राम यात कॅल्शिअमचा स्कोअर कमी असेल आणि ब्लॉकेजेसची संख्या ३० टक्क्यांपेक्षा कमी असेल तर कोरोनरी आर्थरिज डिसिजेस (कॅड) होण्याची शक्यता असते. केवळ आहार नियंत्रित ठेवण्यासह झेपेल तेवढा व्यायाम करणे आणि वजन कमी ठेवणे आवश्यक आहे.
श्रेयस तळपदेला लवकरच डिस्चार्ज
अभिनेता श्रेयस तळपदे याची प्रकृती स्थिर असून त्याला लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती त्याची पत्नी दिप्ती हिने दिली. श्रेयसला गुरूवारी ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगहून घरी परतल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला होता. पत्नीने त्याला अंधेरी पश्चिम येथील बेलव्यू रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने त्याच्यावर अँजिओप्लास्टी केली. सध्या तो डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असे सांगत दिप्तीने श्रेयसच्या चाहत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
हेही वाचा : 

तरूणांसाठी उच्च रक्‍तदाब घातकच; जाणून घ्‍या उपाय
मुलांची रोगप्रतिकारशक्ती का हाेते कमी? जाणून घ्‍या लक्षणे आणि उपाय
वेगन आहारामुळे घटते खराब कोलेस्टेरॉल
तुमचा स्‍वभाव ठरवताे आजार!, जाणून घ्‍या कारण आणि उपाय

The post पन्नाशीत आहार, वजन, व्यायाम ठेवा नियंत्रित; पुरुषांना हृदयविकाराचा धोका अधिक appeared first on पुढारी.

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही वर्षांत ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचे प्रमाण वाढले आहे. अभिनेता श्रेयस तळपदे याला गुरुवारी हृदयविकाराचा झटका बसल्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या भारतीय पुरुषांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण ५० टक्के असल्याची माहिती इंडियन हार्ट असोसिएशनने दिली आहे. चाळीशीच्या पुढे वय …

The post पन्नाशीत आहार, वजन, व्यायाम ठेवा नियंत्रित; पुरुषांना हृदयविकाराचा धोका अधिक appeared first on पुढारी.

Go to Source