ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत

पुढारी ऑनलाईन डेस्क: ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांचे दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आज  (दि.१६) सकाळी औपचारिक स्वागत करण्यात आले. हैथम बिन तारिक हे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागातासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील राष्ट्रपती भवनात उपस्थित आहेत. (Oman Sultan in India) ओमानचे सुलतान तीन दिवसाच्याभारत दौऱ्यावर ओमानचे सुलतान हैथम बिन … The post ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत appeared first on पुढारी.

ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत

पुढारी ऑनलाईन डेस्क: ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांचे दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आज  (दि.१६) सकाळी औपचारिक स्वागत करण्यात आले. हैथम बिन तारिक हे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागातासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील राष्ट्रपती भवनात उपस्थित आहेत. (Oman Sultan in India)
ओमानचे सुलतान तीन दिवसाच्याभारत दौऱ्यावर
ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक आजपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. काल (दि.१५) ४ वाजून ४५ मिनटांनी ते दिल्ली येथील विमानतळावर पोहचले. सुलतान हैथम बिन तारिक हे त्यांच्या कारकिर्दित पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आहेत. भारतात त्यांचे आगमन होताच, परराष्ट्र मंत्रालयाचे व्ही. मुरलीधरन यांनी दिल्लीतील विमानतळावर त्यांचे स्वागत केले. या तीन दिवसांच्या भेटीदरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत. (Oman Sultan Visit to India)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निमंत्रणावर सुलतान भारत दौऱ्यावर
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांची भारताची ही पहिलीच राजकीय भेट असेल. यासोबतच ही भेट भारत आणि ओमानमधील राजनैतिक संबंधांमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, ओमानचा सुलतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निमंत्रणावर भारतात येत आहेत. दरम्यान राजधानी दिल्लीत पोहोचल्यावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ओमानच्या सुलतानांची भेट घेतील. तसेच शनिवारी १६ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू त्यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करतील, असेही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने माध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे. (Oman Sultan Visit to India)

#WATCH | President Droupadi Murmu and Prime Minister Narendra Modi receive Sultan Haitham Bin Tarik of Oman at Rashtrapati Bhavan, in Delhi pic.twitter.com/8kLki0P9MJ
— ANI (@ANI) December 16, 2023

#WATCH | Sultan Haitham Bin Tarik of Oman receives ceremonial welcome at Rashtrapati Bhavan, in Delhi pic.twitter.com/iXPr5A06RR
— ANI (@ANI) December 16, 2023

१९५५ पासून भारत-ओमानमध्ये राजकीय संबंध
भारत आणि ओमान यांची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या जुनी मैत्री आहे. एवढेच नाही तर भारत आणि ओमान यांच्यातील लोकांशी संपर्क 5,000 वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. भारत आणि ओमान या दोन्ही देशात १९५५ पासून राजकीय संबंध आहेत. २००८ मध्ये हे राजकीय संबध धोरणात्मक भागीदारीत बदलले. दरम्यान ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्या भेटीदरम्यान भारत आणि ओमानमधील राजनैतिक संबंध एक महत्त्वाचा टप्पा पार करतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
हेही वाचा:

India’s Tour of South Africa | टीम इंडियाला धक्का, मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर, ‘वन डे’तून दीपक चहरची माघार
Ayodhya Ram Mandir : दुमदुमला भारत! अयोध्येत येताहेत श्रीराम !! युगानुयुगे कायम राहील शरयूतटी मुक्काम !!!
Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रकरणी संभाजीराजे छत्रपतींनी बोलावली खासदारांची बैठक

The post ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क: ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांचे दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आज  (दि.१६) सकाळी औपचारिक स्वागत करण्यात आले. हैथम बिन तारिक हे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागातासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील राष्ट्रपती भवनात उपस्थित आहेत. (Oman Sultan in India) ओमानचे सुलतान तीन दिवसाच्याभारत दौऱ्यावर ओमानचे सुलतान हैथम बिन …

The post ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत appeared first on पुढारी.

Go to Source