गोळीबार कोणावर, हे अजूनही गुलदस्त्यातच
नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा- परिसरातील पवननगर भागात सराईत गुन्हेगाराने गुरुवारी (दि.14) रात्री काहींना मारण्यासाठी गोळीबार (Nashik firing)केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित रोहीत मालेवर गुन्हा दाखल करत त्याच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना झाले आहे. तर गोळीबार कोणावर झाला हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन परिसरातील फुटेज तपासले व आरोपी रोहीत माले असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित आरोपी रोहीत मालेवर गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी मालेवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. दरम्यान संशयित माले याच्या शोधार्थ दोन पथके रवाना झाले आहेत. दरम्यान पोलिसांनी शुक्रवारी पाच ते सहा जणांचे जबाब घेतले आहेत. दरम्यान संशयित आरोपी माले याने का गोळीबार केला व कोणावर केला तसेच त्यांच्यासमवेत कोण होते याची माहिती माले हाती लागल्यानंतरच मिळणार आहे.
हेही वाचा –
पानशेत परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; दोन जनावरांचा फडशा
Indus Civilization : उल्कापातामुळे झाला होता सिंधू संस्कृतीचा विनाश?
Salim Kutta : कोण आहे सलीम मीरा शेख उर्फ सलीम कुत्ता?
The post गोळीबार कोणावर, हे अजूनही गुलदस्त्यातच appeared first on पुढारी.
नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा- परिसरातील पवननगर भागात सराईत गुन्हेगाराने गुरुवारी (दि.14) रात्री काहींना मारण्यासाठी गोळीबार (Nashik firing)केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित रोहीत मालेवर गुन्हा दाखल करत त्याच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना झाले आहे. तर गोळीबार कोणावर झाला हे अजूनही गुलदस्त्यात आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, …
The post गोळीबार कोणावर, हे अजूनही गुलदस्त्यातच appeared first on पुढारी.